Sanjay Raut News Saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut News : महाराष्ट्रात दोन नेते हस्तक, एक राज ठाकरे तर दुसरे...; संजय राऊतांचा घणाघात, VIDEO

Sanjay Raut on Prakash ambedkar : महाराष्ट्रात दोन नेते हस्तक, एक राज ठाकरे तर दुसरे प्रकाश आंबेडकर आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी जोरदार घणाघात केला आहे. अकोला दौऱ्यात संजय राऊत यांनी ही टीका केली.

Vishal Gangurde

अक्षय गवळी, साम टीव्ही प्रतिनिधी

अकोला : 'महाराष्ट्रात दोन नेते हस्तक आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधला आहे. ते अकोल्यात माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी महायुतीवरही जोरदार टीका केली.

खासदार संजय राऊत हे अकोला दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. तसेच राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावरही निशाणा साधला.

संजय राऊत म्हणाले, 'प्रकाश आंबेडर हे आंबेडकर आहेत. आम्ही बाबासाहेबांना मानतो. रामदास आठवले,राजेंद्र गवई हे सुद्धा आंबेडकरांचे खरे वारसदार आहेत. आठवले आंबेडकरांचे विचार समोर नेत आहेत. लोकसभेत प्रकाश आंबेडकरांना ७ जागा देऊ केल्या होत्या. राज्याचे २ नेते हे हस्तक आहेत'.

महायुतीवर टीका करताना संजय राऊत काय म्हणाले?

'महायुतीचा लोकसभेत दारूण पराभव झाला. काही जागा कमी फरकाने पडल्यात आहेत. लाडक्या बहिणींना पैसै मिळालेच पाहिजे. आमचं सरकार आल्यावर या योजनेचे पैसे वाढवू. याआधी फुटलेले लाडके आमदार, लाडके खासदार यांच्यापलिकडे यांना काही दिसत नव्हते. निवडणुका वेळेत घ्याव्याच लागतील, असे संजय राऊत म्हणाले.

'नितीन देशमुखांना सातत्याने त्रास दिला जात आहे. ते विकल्या गेले नाहीत. ते पंतप्रधान मोदी- अमित शहा यांच्या तुरूंगाच्या भिंती फोडून आले आहेत. या महाराष्ट्रात सावत्र कुणी असेल तर ते मोदी आणि शहा आहेत. मोदी-शहा, फडणवीस यांनी जेवढं महाराष्ट्राचं नुकसान केलं, तेवढं 100 वर्षांत कुणी केलं नाही, अशी टीका राऊतांनी केली.

'अजित पवारांना उपरती का झाली? माहिती नाही. काकांचा सल्ला जोपर्यंत घेत होते, तोपर्यंत त्यांचं बरं सुरू होतं. अजित पवार राखी बांधायला सुप्रिया सुळेंकडे जातील, तेव्हा त्या काय करतील, याकडे महाराष्ट्र पाहतोय. त्यांच्यासाठी अख्खा महाराष्ट्र लढला आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: संगमनेरमधून बाळासाहेब थोरात पिछाडीवर

Maharashtra Assembly Election Result: सुरूवातीचे कल महायुतीकडे, १५४ जागांवर आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

SCROLL FOR NEXT