Sanjay Raut News, Shivsena News in Marathi saam tv
मुंबई/पुणे

मुंबईवर अतिरेकी हल्ला झाल्यासारखी बंडखोरांना सुरक्षा; संजय राऊतांचा हल्लाबोल

शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेना (ShivSena) ही उद्धव ठाकरे यांचीच आहे. राजकीय स्वार्थासाठी तुम्ही कितीही अस केला तरीही लोक तुम्हाला स्वीकारणार नाहीत. बाळासाहेब ठाकरेंचे नाव ही एक आग आहे, आगीशी खेळू नका, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला. शिवसनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ३९ आमदारांसह बंडखोरी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे. यावरुन आता राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

संजय राऊत म्हणाले, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुढे घेऊन जावू. हीच शिवसेना एक दिवस महाराष्ट्राचे नेतृत्व करेल. शिवसेनेच्या पाठित अनेकांनी असे वार केले. पण त्यांचे काय झाले तुम्हाला माहित आहे. महाराष्ट्राच्या मातीत तुकारामाचे अभंग उतरले, ढोंगाला कधी स्थान मिळाले नाही. आजही भाजपला स्वत:चे अस्थित्व दाखवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे लागले. आजही तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करावा लागत आहे, यातच शिवसेनेचे महत्व सिद्ध होत आहे, असंही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

मला बाहेरुन प्रमुख नेत्यांचे फोन येत आहेत. एवढी पोलिसांची सुरक्षा का आहे, काही अतिरेकी हल्ला झाला आहे का? अश अनेकजण विचारत आहेत. बंडखोर आमदारांना एवढी सुरक्षा दिली जात आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

तुमच राज्य कशापद्धतीने आले हे राज्याने पाहिले आहे. तरीही आम्ही तुम्हाला राज्य चालवण्यासाठी शुभेच्छा देत आहे. आम्ही पक्षासाठी झोकून काम करु. शिवसेना (ShivSena) गरुड झेप घेईल. ४० आमदारांच्या गटाला तुम्ही आज जर मुख्यमंत्री पद देत आहात, तर मग २०१९ साली शिवसेना हक्काची मागणी करत असताना तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला तुम्ही का नाकारलं असा सवालही राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लादी पुसल्यानंतरही चिकट वाटते? पाण्यात 'हा' एक पदार्थ मिसळून पाहा

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरे यांनी नागपुरात येथील संघस्थानी जाऊन मतमस्तक व्हावे - आमदार रवी राणा

Pyarelal wife Death: ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल यांच्यावर दुःखाचा डोंगर; पत्नी सुनीला शर्मा यांचे निधन, संगीतविश्वात हळहळ

Hair Growth Tips: केस गळणं होईल कायमचं बंद! डोक्यावर नवीन केस आणेल 'हा' १ चमत्कारी काळा पदार्थ

Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; कॅन्सरवर मात केली, पण काळाने केला घात, मनोरंजन विश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT