Sanjay Raut On Devendra Fadnavis Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: 'लायकी' शब्दावरून राज्यातलं राजकारण तापलं; राऊतांनी फडणवीसांवर केली टीका, तर भाजपने दिलं प्रत्युत्तर

Sanjay Raut On Devendra Fadnavis: 'लायकी' शब्दावरून राज्यातलं राजकारण तापलं; राऊतांनी फडणवीसांवर केली टीका, तर भाजपने दिलं प्रत्युत्तर

साम टिव्ही ब्युरो

Sanjay Raut On Devendra Fadnavis:

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण हे खूपच खालच्या पातळीव जाताना दिसत आहे. दिवसेंदिवस नेत्यांना एकमेकांना आरोप-प्रत्यारोप करण्यात जास्त रस येतोय की काय असं दिसून येतंय. दरम्यान महाराष्ट्रात लायकी या शब्दावरून जोरदार राजकारण पाहायला मिळतंय.

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्यात शैलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. ठाकरे गटानं आजचा अग्रलेखाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक शब्द टीका केली आहे. अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटानं देवेंद्र फडणवीस यांची लायकी काढली आहे.

फडणवीसांची कपॅसिटी आहे व ती कपॅसिटी फक्त दिल्लीतच उपयुक्त असल्याचे शिंदे गटाने ठरवले आहे खरे, पण या कपॅसिटीचा शोध मोदी-शहांना का लागू नये? कपॅसिटी असताना फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरून खाली आणले व कपॅसिटी नसलेल्यांच्या हाताखाली हरकाम्या करून ‘लायकी’ काढली हे बरे नाही. फडणवीसांची गरज दिल्लीत आहे, असे शिंदे गट म्हणतोय. मणिपूरपासून कश्मीरपर्यंत बरेच प्रश्न आहेत, चिनी सैन्यही देशाच्या सीमा भागांत घुसले आहे. हे सर्व प्रश्न सोडविण्याची फडणवीसांची कपॅसिटी आहेच. तर फडणवीसांना लायकी हा शब्द फार आवडतो, असा खोचक टोला संजय राऊतांनी फडणवीसांना लगावलाय. दरम्यान, संजय राऊतांची ही टीका भाजपला चांगलीच झोंबल्याचं पाहायला मिळालं आहे. (Latest Marathi News)

अग्रलेखातील टीकेनंतर भाजप आमदार नितेश राणेंनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केलाय. खिचडी चोरण्याएवढी संजय राऊत यांची लायकी आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. रश्मी ठाकरे यांना सामनाचं संपादक बनवून संजय राजाराम राऊत यांची त्यांनी लायकी काढली आहे, असं आम्ही म्हणायचं का? संजय राऊत यांची साधी ग्रामसेवक बनायची लायकी नाही. संजय राऊत 2019 ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न बघत होते. शरद पवार माझं नाव पुढे घेतील, यासाठी ते आमदारांना फोन करत होते. मात्र, दोन ते तीन आमदार यांच्या बैठकीला आलेच नव्हते, हीच आहे का संजय राऊत यांची लायकी?”

पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, “संजय राऊत यांनी आधी स्वतःच्या लायकीबद्दल बोलायला हवं. राजाराम राऊत यांच्या परिवारामध्ये भरपूर कॅपॅसिटी आहे. मात्र, त्यांची कॅपॅसिटी खिचडी चोरण्यामध्ये आहे.''

गरीब कामगारांच्या खिचडी चोर प्रकरणांमध्ये संजय राऊत यांच्या कुटुंबातील लोकांची नावं होती. ही कपॅसिटी आणखीन कोणाच्याही कुटुंबामध्ये नाही. ही कपॅसिटी फक्त राजाराम राऊत यांच्या कुटुंबामध्ये आहे आणि यासाठी आपण त्यांचा सन्मान करायला हवा.”एकाबाजूला ज्येष्ठ नेत्यांना विठ्ठल म्हणायाचे आणि त्यांच्याच घरात भांडणे लावण्याचे काम शकुनी मामा संजय राऊतांनी केले. आग आण काड्या लावण्याचे काम स्वत:हून बंद करुन मग इतरांना संजय राऊत यांनी सल्ला द्यावा, असे भाजप आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हटलं. राणे यांनी आज सिंधुदुर्ग येथे माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांवर टीकास्त्र सोडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: शाळेसाठी दररोज ६ किमी पायपीट; शेतातही केले काम; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

Saturday Horoscope: पाच राशींच्या जीवनात येणार आनंदी-आनंद; होणार धन वर्षाव, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Bhadrapada Amavasya 2025: आजच्या शनी अमावस्येचं महत्त्व जाणून घ्या; 'या' चुका करणं टाळा

Pune: बैलगाडा शर्यतीत अपघाताचा थरार, तरुण खाली पडला अन्..., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Latur: मिरवणुकीदरम्यान बैल अचानक उधळला, ग्रामस्थ सैरावैरा पळू लागले; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT