Sanjay Raut Saam TV
मुंबई/पुणे

बाळासाहेबांच्या आठवणीने मी भावुक होतो - संजय राऊत

बाळासाहेबांनी माझा हात पकडला नसता तर हा संजय राऊत दिसला नसता.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : छत्रपती आणि बाळासाहेब यांचे (Balasaheb Thackeray) विचार घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. कितीही संकटं आली तरीही बाळासाहेब आपल्या पाठीशी कायम असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. ते आज मुंबई विद्यापीठात 'मुंबई विद्यापीठ अध्यासन केंद्र आणि सार्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.बाळासाहेब ठाकरे' यांच्या जीवनातील छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आलेले प्रदर्शन पाहण्यासाठी ते आले होते. यावेळी ते बोलत होते.

राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीने मी नेहमी भावुक होतो. बाळासाहेबांनी माझा हात पकडला नसता तर हा संजय राऊत दिसला नसता. त्यांना जसा हवा होता तसा संजय राऊत बाळासाहेबांनी घडवला. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलं. विश्वासघात करायचा नाही, पाठीत खंजीर खुसायचा नाही हे बाळासाहेबांनी शिकवल्याचं ते म्हणाले.

हे देखील पाहा -

तसंच शरद पवार आणि बाळासाहेब (Sharad Pawar And Balasaheb Thackeray) यांची मैत्री हे पडलेले कोडं असायचं. एकमेकांवर राजकीय टीका करायचे मात्र मैत्री कायम होती. तसंच राज ठाकरे यांना मी आमंत्रण देतो त्यांनी हे फोटो प्रदर्शन पाहायला यावं. बाळासाहेब यांनी राजकारण बदललं, दिल्लीतून चालणाऱ्या राजकारणाचा केंद्रबिंदू त्यांनी मुबंई ठरवला असल्याचंही राऊत यावेळी म्हणाले.

दरम्यान, छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांचा आदर आहे, शिवसेनेने ही जागा का लढवू नये. त्या जागेवर कोणाची मालकी नाही. संभाजी राजे हे आदरणीय आहेत ते निवडणुकीत उतरले आहेत याचा अर्थ त्यांनी 42 मतं जमवली असतील. आमच्याकडे ही अधिक मते नाहीत त्याची जुळवाजुळव करावी लागते. खासदारकीच्या निवडणुकीत आम्ही घोडेबाजार होऊ देणार नाही असंही राऊतांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amaravati Politics: मतदानापूर्वी भाजपकडून मोठी कारवाई, १५ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Bhandara : अन् अचानक आकाशातून पडले दगडाचे तुकडे, भंडार्‍यात उल्का वर्षाव झाल्याचा संशय, नेमकं सत्य काय?

Homemade Toner : तुम्हाला त्वचेचा ग्लो वाढवायचा आहे? मग हे ५ स्वस्तात मस्त टोनर घरीच बनवा

Prasar Bharti Jobs: प्रसार भारतीमध्ये नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT