Video: वानखेडेंवर पोलिसांची पाळत? NCB कारवाईवरुन राजकीय नेत्यांत जुंपली Saam Tv
मुंबई/पुणे

Video: वानखेडेंवर पोलिसांची पाळत? NCB कारवाईवरुन राजकीय नेत्यांत जुंपली

कार्डिलिया क्रूझवर NCB ने कारवाई करत २० जणांना अटक केली. या कारवाईत अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानचा सहभाग असल्याने या प्रकरणाची जास्त चर्चा झाली.

सुरज सावंत

मुंबई: कार्डिलिया क्रूझवर (Cordelia Cruises) NCB ने केलेल्या कारवाईनंतर NCB चे झोनल डायरेक्टट समीर वानखडे यांच्यावर पोलिस पाळत ठेवत असल्याची तक्रार वानखडे यांनी महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) मुख्यालयात केली. यानंतर राजकिय नेत्यांकडून याचं राजकरण करण्यास सुरूवात केली आहे. मात्र असे कुठलेही आदेश दिलेले नसल्याची प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी देत या प्रकरणाचा हवाच काढून टाकली.

कार्डिलिया क्रूझवर NCB ने कारवाई करत २० जणांना अटक केली. या कारवाईत अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानचा सहभाग असल्याने या प्रकरणाची जास्त चर्चा झाली. मात्र NCB च्या या कारवाईवर मंत्री नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं, नवाब यांनी NCB च्या कारवाई दरम्यान भाजपचे पदाधिकारी मनिष भानुशाली हे काय करत होते. असा प्रश्न उपस्थित करत NCB च्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले.

या प्रकरणात पुढे भाजप आमदार नितेश राणे यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा दाखला देत, नवाब मलिक यांच्यावर टिका केली. राजकिय नेत्यांच्या या गुन्ह्यातील आरोप प्रत्यारोपाबाबत NCB ने मात्र कोणतिही प्रतिक्रिया दिली नाही. अशात NCB चे झोनल डायरेक्टर यांनी सोमवारी महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात भेट देत, मुंबईचे पोलीस आपल्यावर पाळत ठेवत असल्याची तक्रार केल्याने वातावरण आणखी चिघळलं.

वानखडे यांनी तक्रारीतून नुसते आरोप केले नाहीत तर त्याचा पुरावा म्हणून वानखडे आईच्या निधनानंतर नेहमी श्रद्धांजली देण्यासाठी जात, स्मशानभूमितले सीसीटीव्ही रेकार्डिंगही दिले. मुंबईसह महाराष्ट्रात अशा वरिष्ठ अधिकाऱ्यावर पाळत ठेवायची ही काही पहिली वेळ नाही. या पूर्वी अँटिलिया प्रकरणाचा तपास सुरू असताना सचिन वाजेने त्याच्यावर पाळत ठेवल्याचे आरोप केले होते. याबाबत ज्यावेळी समीर वानखडे याच्याकडे पत्रकारांनी विचारणा केली असता. त्यानी कोणतिही प्रतिक्रिया दिली नाही.

या प्रकरणावर आता आशिष शेलार यांनी ट्विटवरून 'माजी गृहमंत्री व माजी पोलिस आयुक्तांच्या मागे पोलिस आहे. आता NCB अधिकाऱ्यांच्या मागे पोलिस आहेत. महाराष्ट्रात पोलीस पोलीस खेळ सुरू आहे का? असा सवाल त्यांनी केला. त्यावर खासदार अरविंद सावंत यांनी वानखडे यांना उगाच तुम्ही हिरो बनवलात. महाराष्ट्रा पेक्षा जास्त ड्रग्ज गुजरातमधून पकडलं आहे. वानखडेंची महाराष्ट्रापेक्षा जास्त गरज गुजरातला आहे. नवाब मलिक यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या आधी असे सावंत म्हणाले. मात्र वानखडे यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याबाबतचे प्रश्न राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारले असता. अशा कुठल्याही सूचना देण्यात आलेल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी परतीच्या पावसाचा धुडगूस

Raigad Shocking : रायगडमधील कोट्यवधींच्या अपहार प्रकरणात मोठा ट्विस्ट; मुख्य आरोपीने मेहुणीच्या घरात आयुष्य संपवलं

Ladki Bahin Yojana: १२ हजार भावांनी मारला लाडकी बहिणींच्या पैशांवर डल्ला; योजनेत १६४ कोटींचा घोटाळा

Sonali Kulkarni: गुलाबी साडी अन् लाली...; सोनाली कुलकर्णीचा दिवाळी स्पेशल लुक, पाहा फोटो

Maharashtra Weather Alert: ऐन दिवाळीत पावसाने घातला धुमाकूळ; पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT