Sameer Wankhede
Sameer Wankhede SaamTV
मुंबई/पुणे

समीर वानखेडे मुस्लीमच.. पहिल्या बायकोच्या वडिलांचा खुलासा (पहा व्हिडीओ)

वैदेही काणेकर, सामटीव्ही, मुंबई

मुंबई : NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक Navab Malik यांनी गंभीर आरोप केलेत. वानखेडेंनी आपला खरा धर्म लपवला असून त्यांनी खोट प्रमाणपत्र दाखवत नोकरी मिळवली असल्याचं सांगितलं. मलिकांनी वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा फोटो त्यांच्या लग्नाच मॅरेज सर्टीफिकेट (Marriage certificate) देखील त्यांनी माध्यमांसमोर आणलं असून ते मुस्लिम असल्याचच त्यांनी जाहीर केलं होतं.मात्र वानखेडेंनी हे आरोप धुडकावले होते. तसेच 'माझी आई मुस्लिम होती बाबा हिंदू आहेत (Mother Muslim father Hindu) आणि मी दोघांवरही खूप प्रेम करतो. माझ्या आईने मुस्लिम पद्धतीने विवाह करण्यास सांगितला होता म्हणून मी तो केला.' असा खुलासा केला होता.

मुस्लीम होते म्हणूनच आम्ही लग्न ठरवलं -

मात्र आता समीर वानखेडें यांच्या पहिल्या पत्नीचे वडील डॉ.जाहिद कुरेशी (Dr. Zahid Qureshi) यांनी वानखेडे मुस्लीमच आहेत असं सांगितल्याने पुन्हा वानखेडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. डॉ.जाहिद कुरेशी म्हणाले ' समीर वानखेडे हे मुस्लीम होते म्हणूनच आम्ही लग्न ठरवलं. लग्नासाठी त्यांच्याकडून विचारणा झाली होती. तसेच समीर वानखेडे नमाज पढायचे. रोजे देखील पाळायचे त्यांच्या घरी मुस्लीम Muslim धर्माचे पालन होत होते असा खुलासा देखील त्यांनी केला आहे.

शिवाय त्यांच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडेच (Daud Wankhede) असल्याच ही कुरेशी यांनी सांगितलं. त्यांची आई चांगली होती. त्यांच्या निधनानंतर काय झालॆ माहिती नाही. असही ते म्हणाले आहेत. वानखेडे मुस्लीम होते म्हणूनच हा निकाह झाला. आणि आमच्यासोबत धोका झाला असं आम्हाला वाटत नाही कारण आमचा आता काही संबंध नसल्याचही त्यांनी स्पष्ट केलं.

लग्नावेळी ते मुस्लिमच होते -

समीर वानखेडेंच लग्न (Sameer Wankhede marriage) ज्या मौलानानं लावलं आहे त्यांनी समीर वानखेडे हे मुस्लिम (Muslim) असून त्यांचे वडील, बहीण, आई सगळे मुस्लीम आहेत, समीरच्या लग्नावेळी ते मुस्लिमच होते, समीर वानखेडे हे खोटं बोलत आहे. तसेच समीर वानखेडे मुसलमान नसतां तर लग्नच लागले नसते असही मोलानांनी याआधी सांगितलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

Maharashtra Election: नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांचं चेकिंग; चेकिंग नव्हे स्टंटबाजी, ठाकरे गटाचा आरोप

Swati Maliwal Assault Case : 'माझ्याबाबत जे घडलं ते,...; मारहाणीच्या घटनेनंतर आप नेत्या स्वाती मालीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

Mega block : मध्य रेल्वेवर आजपासून पंधरा दिवस ब्लॉक; कोणत्या मार्गांवर होणार परिणाम? जाणून घ्या

Maharahstra Election: अजित पवार गेले कुठे? अखेरच्या टप्प्यात अजित पवारांची प्रचाराकडे पाठ?

SCROLL FOR NEXT