Sameer Wankhede Is Not Muslim
Sameer Wankhede Is Not Muslim Saam TV
मुंबई/पुणे

Sameer Wankhede: समीर वानखेडे जन्माने मुस्लिम नाहीत! समितीने तक्रार फेटाळली, नवाब मलिक यांना झटका

सुरज सावंत

मुंबई: कार्डिलिया क्रुझ प्रकरणी चर्चेत आलेले एनसीबीचे (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे-NCB) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने मोठा दिलासा दिला आहे. समीर वानखेडे हे जन्माने हिंदुच आहेत, ते जन्माने मुस्लिम असल्याचे सिद्ध होत नाही असं म्हणत समितीचा निकाल समीर वानखेडेंच्या बाजूने लागला आहे. राज्याचे माजी अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे आरोप केले होते, त्यानंतर हे प्रकरण जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे गेले होते. आता याप्रकरणी समीर वानखेडेंच्या बाजूने निकाल लागला आहे. (Sameer Wankhede Latest News)

हे देखील पाहा -

माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम नाहीत. समीर वानखडेंच्या वडिलांनी हिंदु धर्माचा त्याग करून मुस्लिम धर्माचा स्विकार केल्याचे सिद्ध होत नाही. समीर वानखडे हिंदु महार ३७ अनुसुचित जातीचे असल्याचे सिद्ध होत आहे. समीर वानखडेंविरोधात केलेली तक्रार सिद्ध होत नसल्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने वानखेडेंलविरोधातली तक्रार फेटाळली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप मलिक यांनी केल्यानंतर समितीसमोर याप्रकरणी अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. २०२१ च्या ऑक्टोबरमध्ये समीर वानखेडे आणि त्याच्या टीमने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली होती. यानंतर महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक, ज्यांच्या जावयालाही एनसीबीने अटक केली होती, त्यांनी समीर वानखेडेंवर भ्रष्टाचार आणि खंडणीचा आरोप केला होता.

मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर जातीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचा आणि नोकरी मिळवण्यासाठी तो अनुसूचित जातीचा असल्याचा खोटा दावा केल्याचा आरोपही मलिकांनी केला होता. यानंतर, महाराष्ट्र सरकारच्या जात दक्षता समितीने समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेल्या जात प्रमाणपत्रासंबंधीच्या आरोपांची चौकशी सुरू केली. याता आता वानखेडेंना मोठा दिलासा मिळाला आहे.

वानखेडेंच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांचे आरोप (Video)

समीर वानखेडेंच्या पहिल्या पत्नीचे वडील डॉ. जाहिद कुरेशी यांनी साम टीव्हीशी बोलताना काही माहिती उघड केली होती. डॉ.जाहिद कुरेशी म्हणाले होते की, ''समीर वानखेडे मुस्लीम होते म्हणूनच आम्ही लग्न ठरवलं. लग्नासाठी त्यांच्याकडून विचारणा झाली होती. समीर वानखेडे नमाज पढायचे. रोजा पढायचे. त्यांच्या घरी मुस्लीम धर्माचे पालन होत होते. त्यांच्या वडिलांचे नाव 'दाऊद वानखेडे' होतं. त्यांची आई चांगली होती. त्यांच्या निधनानंतर काय झाले माहिती नाही. मुस्लीम असल्याशिवाय 'निकाह' झाला नाही. आमच्यासोबत धोका झाला असं आम्हाला वाटत नाही कारण आमचा आता काही संबंध नाही''.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

व्हिजन, मुद्दे नसल्यानेच विरोधकांकडून अपप्रचार सुरू : खासदार इम्तियाज जलील

Special Report : Fake Currency | यूट्यूबवर प्रशिक्षण घेऊन घरातच बनावट नोटा छापणाऱ्यांना अटक

Special Report | मुंबईत नोकरी, मात्र मराठी माणसाला 'नो एन्ट्री', गुजराती कंपनीचा मराठी विरोधी फतवा?

Nashim Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेस नेत्यांना यश.. ९ दिवसांनंतर राजीनामा मागे

Special Report : Kolhapur Lok Sabha | कोल्हापूरचा आखाडा कोण जिंकणार?

SCROLL FOR NEXT