sambhajiraje chhatrapati held meeting in pune with members for shivrajyabhishek sohala  Saam Tv
मुंबई/पुणे

Shivrajyabhishek Sohala 2024 : शिवराज्याभिषेक सोहळ्याला आचारसंहितेचा अडसर? सरकारने मार्ग काढावा : संभाजीराजे

शिवराज्याभिषेकास 350 वर्षे पूर्ण होत आहेत. वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी सोहळा साजरा केला जाणार आहे. एकूणच या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी शिवभक्तांच्या सूचना मागविण्यात येत आहेत.

Siddharth Latkar

- सचिन जाधव

लाेकसभा निवडणूक आचारसंहिता 10 जून पर्यंत असल्याने थोडी अडचण आहे पण सोहळा दिमाखदार होण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोललो असून शिवराज्याभिषेक सोहळा राष्ट्रीय उत्सव सारखा साजरा करावा यासाठी सरकारने लक्ष घालावे अशी मागणी केल्याचे संभाजीराजे छत्रपतींनी यांनी स्पष्ट केले. येत्या 6 जूनला 350 व्या शिवराज्याभिषेक साेहळ्याची तयारी पुण्यातून सुरु झाली आहे. त्यावेळी राजेंनी माध्यमांशी संवाद साधला. (Maharashtra News)

किल्ले रायगड येथे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे 6 जूनला साजरा होणाऱ्या 350 व्या शिवराज्याभिषेक साेहळ्याच्या तयारीसाठी पूर्व नियोजन राज्यव्यापी बैठक पुणे येथे नुकतीच झाली. या बैठकीस युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले शिवराज्याभिषेकास 350 वर्षे पूर्ण होत आहेत. वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी सोहळा साजरा केला जाणार आहे. एकूणच या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी शिवभक्तांच्या सूचना मागविण्यात येत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

३५० वा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वर्ष पूर्ततेचे हे वर्ष आहे. तेवढ्याच जोमाने उत्सव होण्यासाठी राज्यव्यापी बैठक घेतली. रायगड जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता १० जूनला असल्याने थोडी अडचण पण सोहळा दिमाखदार होण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यास गेल्या वर्षी निधी आला हाेता. यंदा देखील तीच अपेक्षा आहे.

हा साेहळा साजरा हाेणार आहे परंतु शिवभक्तांनी सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी काही उपयायाेजना कराव्या लागतात. त्या सरकारी पातळीवर केल्या जातात. त्या युद्धपातळीवर राबविण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. हा साेहळा राष्ट्रीय उत्सव सारखा साजरा करावा यासाठी सरकारने लक्ष घालावे असेही राजेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Road Accident Prediction Device: चालकाला डुलकी आली तरी नाही होणार दुर्घटना; ब्रेक लावून कारही थांबेल

Vivo V60e: जबरदस्त बॅटरी अन् दमदार फीचर्ससह Vivo V60e भारतात लाँच; किंमत किती?

अधिकाऱ्याला जाळ्यात अडकवलं; शरीरसंबंध, VIDEO शूट अन् पैशांची मागणी, 'असं' उघडं पडलं महिलेचं पितळ

Maharashtra Live News Update : धुळ्यात पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग सुरु

Karva Chauth 2025: यंदाच्या करवा चौथला बनतोय अशुभ योग; 'या' वेळी विवाहित महिलांनी पुजा करणं टाळाच

SCROLL FOR NEXT