Sambhaji Brigade on Shiv Sena Uddhav Thackeray Group Saam Tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray: ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटावर मित्र पक्षाने व्यक्त केली नाराजी, उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित म्हटलं...

Sambhaji Brigade on Thackeray Group : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संभाजी ब्रिगेडने ठाकरे गटावर नाराजी व्यक्त करत उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. संभाजी ब्रिगेड नाराजीचे काय आहे कारण? जाणून घ्या...

Saam Tv

विधानसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर संभाजी ब्रिगेडने ठाकरे गटावर नाराजी व्यक्त केली आहे. काही महिन्यांआधीच संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना ठाकरे गटात युती झाली आहे. निवडणुकीआधी संभाजी ब्रिगेडच्या मुंबईमधील पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटावर नाराजी व्यक्त केली आहे.

कुर्ला विधानसभा मतदारसंघात घडलेल्या घडामोडींमुळे या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं समजतं आहे. आपली नाराजी व्यक्त करायला संभाजी ब्रिगेडचे मुंबई अध्यक्ष सुहास राणे यांनी उद्धव ठाकरे यांना थेट पत्र लिहिलं आहे.

सुहास राणे पत्रात काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात सुहास राणे म्हणाले आहेत की, ''मी मराठा समाजाच्या वतीने पत्र लिहित असून आपणांस कळवण्यात खेद होत आहे की, आपल्या पक्षाच्या माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांना संभाव्य उमेदवारी घोषित केली असून आता मराठा समाजात अत्यंत मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे.''

सुहास राणे पत्रात म्हणाले आहेत की, ''माजी नगरसेविका प्रविणा मनीष मोरजकर यांनी त्यांच्या नगरसेविकेच्या कार्यकाळात मराठा समाजातील ११ हुन अधिक लोकांवर वेगवेगळ्या प्रसंगी खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे नेहरूनगर पोलीस ठाण्यात दाखल केल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत असून, अॅट्रॉसिटी सारख्या कलमांचा चुकीचा वापर करून मराठा समाजाला बदनाम करण्याचे काम त्यांच्याकडून झाले आहे. असे आमच्या निदर्शनास आले आहे.''

राणे यांनी पत्रात पुढे लिहिलं आहे की, ''प्रविणा मोरजकर यांनी मराठा समाजाच्या लोकांवर दाखल केलेल्या खोट्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमुळे त्यांच्या विरोधात मराठा समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे. अशा व्यक्तीला कुर्ला विधानसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून आपण पाहत असल्याची बातमी समोर आल्याने मराठा समाज प्रचंड दुखावला आहे. मराठा समाजाला खोट्या अॅट्रॉसिटीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकवून त्रास देणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देऊ नये, अशी आमची कळकळीची विनंती आहे. या प्रकरणात आपण दखल घेऊन, आपणा समोर हा विषय भेटून मांडण्यासाठी संधी द्यावी ही विनंती.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Birthday Rituals: वाढदिवसाला केक का कापला जातो? जाणून घ्या रंजक माहिती

Health of IT employees: 84 टक्के IT सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांना होतोय 'हा' गंभीर आजार; केंद्र सरकारकडून गाइडलाइन्स जाहीर

Maharashtra Live News Update : अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांवरोधात अधिकाऱ्यांचं आंदोलन

Shocking News: धक्कादायक! मृत व्यक्तीच्या बँक खात्यात जमा झाले १०,०१,३५,६०,००,००,००,००,०१,००,२३,५६,००,००,००,००,२९९ रूपये, नेमकं प्रकरण काय?

Lonavala MLA Sunil Shelke : तालुक्याची बदनामी थांबवा, नाहीतर अधिवेशनात तमाशा उघड करू: आमदार शेळके यांचा इशारा

SCROLL FOR NEXT