संभाजी ब्रिगेडचा अजूनही प्रस्ताव आलेला नाही - चंद्रकांत पाटील Saam Tv
मुंबई/पुणे

संभाजी ब्रिगेडचा अजूनही प्रस्ताव आलेला नाही - चंद्रकांत पाटील

इतक्या सहज आमचा निर्णय होत नाही, त्याची मोठी प्रक्रिया आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिलीप कांबळे

मावळ - भाजप BJP हा पक्ष कोणा एका व्यक्तीचा नाही. कोणताही निर्णय समूहाने घेतला जातो. पुरुषोत्तम खेडेकर Purushottam Khedekar यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आलाच तर आमची नऊ सदस्यांची कोअर कमिटी यावर चर्चा करेल असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrkant Patil यांनी देहूमध्ये Dehu व्यक्त केले. ते खासगी कार्यक्रमात आले होते यावेळी ते बोलत होते.

हे देखील पहा -

दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या कोणाशी चर्चा झालेली नाही. असा कोणताही विषय राज्यातील कोणत्याही नेत्याकडे आला तर त्यांनी माझ्याशी शेअर करायला हवा. त्यांचं हे असं म्हणणं आहे, आपण काय करूयात. आमचा ऑल इंडिया नव्हे तर ऑल वर्ल्ड पक्ष आहे. त्यामुळे इतक्या सहज आमचा निर्णय होत नाही, त्याची मोठी प्रक्रिया आहे.

हे सगळंच हवेतील बाण आहे आणि जर-तर वर मी उत्तर देत नाही. वटहुकूम काढायचा होता तर सरकारने चार महिन्यांपूर्वी करायला पाहिजे होता. सुप्रीम कोर्टाने इंपेरिकल डाटा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या परंतु चार महिन्यात सरकारला ते काम जमलेले नाही. ओबीसी समाजाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम केले आहे.

Edited By - Shiavni Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TikTok भारतात पुन्हा सुरू होणार का? खुद्द मोदी सरकारमधील मंत्र्यानं दिली नेमकी माहिती

Latkan designs for Blouse: ब्लाउजच्या ट्रेंडी डिझाईनसाठी हे लटकन ट्राय करा, मिळेल एक क्लासी लूक

OBC Protest: मराठा आरक्षण GR विरोधात ओबीसी आक्रमक, भुजबळांनीही दिलं सरकारला आव्हान

Maharashtra Tourism: लोणावळा, माथेरान विसराल; महाराष्ट्रातील 'हे' स्वर्गाहूनी सुंदर हिल स्टेशन, कधी पाहिलंत का?

Maratha Reservation: आता मुंबईला जाणारे दूध,भाजीपाला बंद करू; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा इशारा

SCROLL FOR NEXT