Samana Vs BJP, Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

शिवसेनेचे चिन्ह गोठवणे हाच हेतू...; 'सामना'तून शिंदे गटावर टीका, राज ठाकरेंचे आभार

BJPला सरतेशेवटी जमिनीवरील परिस्थितीचा अंदाज आल्याने महाराष्ट्राच्या महान संस्कृती व परंपरेचा आदर राखून भाजपने आपला उमेदवार मागे घेतला.

सुरज सावंत

मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना (Samana) वृत्तपत्राच्या अग्रलेखातून नेहमीच चालू राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं जातं. अशातच आता राज्याच्या राजकारणातील मागील जवळपास दोन महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरेलेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आजचा अग्रलेख लिहण्यात आला असून त्यातून भाजपसह एकनाथ शिंदे यांच्या गटावर टीका करण्यात आली आहे. (Andheri East By-Election)

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक हे केवळ निमित्त होतं. मात्र, मिंदे गटाला हाताशी धरून पक्षाचं नाव व चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवणे हाच खरा भाजपचा हेतू होता असा आरोप सामनामधून करण्यात आला आहे. शिवाय भाजपने अगदी शेवटच्या क्षणी घेतलेल्या माघारीमुळे ही निवडणूक होतच असल्याचं सामनामध्ये म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ -

भाजपला (BJP) सरतेशेवटी जमिनीवरील परिस्थितीचा अंदाज आल्याने महाराष्ट्राच्या महान संस्कृती व परंपरेचा आदर राखून भाजपने आपला उमेदवार मागे घेतला. अर्थात, भाजपने उमेदवार मागे घेतला, पण पोटनिवडणूक अद्याप टळली नाही. 14 पैकी सातजणांनी माघार घेतली व काही उमेदवार रिंगणात कायम आहेत.

त्यांचे काय करायचे? वास्तविक अशी निवडणूक यासाठी टाळायची असते की, ज्या उमेदवाराचे निधन झाले आहे त्यांची पत्नी किंवा मुलगा त्यांच्या जागी लढत असतो. दुसरे म्हणजे, सरकारी श्रम व पैशांचा अपव्यय टाळता आल्यास पाहावे, हादेखील एक विचार असतो. मात्र यासाठी ‘परंपरा’ म्हणून सगळय़ांनी एकत्र बसून पहिल्यापासून निर्णय घ्यायचे असतात.

राजकारणात मढय़ाच्या टाळूवरचे लोणी खाऊ नये ही महाराष्ट्राची परंपरा व संस्कृती आहे. अंधेरीच्या बाबतीत निर्णय घेण्यास उशीर झाला व भाजपने माघार घेऊनही आता पोटनिवडणूक होईल असं सामनामध्ये लिहंल आहे.

शिवाय लटके यांच्या राजीनाम्यासाठी झालेला सर्व प्रकार उच्च न्यायालयास हस्तक्षेप करावा लागलेला हस्तक्षेप यावरुन देखील भाजपवर सडकून टीका केली आहे. स्वर्गीय लटके यांच्या पत्नीस उमेदवारी जाहीर केल्यावर त्यांचा महानगरपालिकेतील नोकरीचा राजीनामा अडवून ठेवण्याची एक हलकट खेळी झाली. त्यात अखेर उच्च न्यायालयास हस्तक्षेप करावा लागला. हे काही महाराष्ट्राच्या महान परंपरेला, संस्कृतीस धरून झाले नसल्याचं सामाना मध्ये म्हटलं आहे.

शरद पवार राज ठाकरेंचे आभार -

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज ठाकरेंचे (Raj Thackeray) आभार मानले आहेत, शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने निवडणूक बिनविरोध व्हावी असे आवाहन आधीच केले. त्याकडे दुर्लक्ष केले. श्री. राज ठाकरे यांनी निवडणूक बिनविरोध झाल्यास लटके यांच्या आत्म्यास शांती लाभेल असे पत्ररूपी आवाहन केल्यावर भाजपने त्या पत्राचा विचार केला त्यामुळे भाजप व राज ठाकरे यांचे आभार मानायला हवेत असंही देखील अग्रलेखात म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Thakur : 'तू मराठी आहेस का?' चाहत्याच्या प्रश्नावर मृणालचं खास उत्तर, गायले 'हे' गाणं

Laziest Zodiac Sign: या राशींच्या व्यक्ती असतात अळशी; कोणत्याही कामाला देतात नकार

VIDEO : मंत्रिपदासाठी महायुतीत रस्सीखेच, पुण्यातील आमदारांनी ठोकला मुंबईत तळ

Viral Video: ओल्ड इस गोल्ड! ८२ वर्षाच्या आजी बाईंनी केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून तरुणाई गार; पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: कसबा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने इन ॲक्शन मोड

SCROLL FOR NEXT