पॅराफीनची दूधात भेसळ करून विक्री अभिजीत सोनावणे
मुंबई/पुणे

पॅराफीनची दूधात भेसळ करून विक्री

वावी पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल

अभिजीत सोनावणे

नाशिक - मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या पॅराफीन सदृश्य रसायनाची गाईच्या दुधात भेसळ करून विक्री करणाऱ्या दूध Milk संकलन केंद्र चालकासह चार जणांच्या विरोधात वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक Nashik येथील अन्न भेसळ प्रतिबंधक व सुरक्षा विभागाच्या पथकाने कारवाई करून ही बाब उघडकीस आणली आहे.

हे देखील पहा -

सिन्नर तालुक्यातील पाथरेमध्ये अक्षय ज्ञानेश्वर गुंजाळ याचे श्री स्वामी समर्थ दूध संकलन केंद्र आहे. पाथरे व परिसरातील शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले गाईचे दूध तो जवळके तालुका कोपरगाव येथील न्यू शनेश्वर दूध संकलन केंद्रात विकतो. दूध व्यवसायात अधीकचा नफा कमावण्यासाठी अक्षय शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या दुधामध्ये 'हे' पावडर, सोयाबीन रिफाईंड तेल आणि मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या 'पॅराफीन' सदृश्य रंगहीन रसायनांची भेसळ करून जवळके येथील दूध संकलन केंद्रात विक्री करत असल्याचा प्रकार नाशिक येथील अन्नभेसळ प्रतिबंधक व सुरक्षा विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीत उघड झाला.

अक्षय याने हे रसायन शेख नामक व्यक्तीसह हेमंत पवार या इसमाकडून विकत घेतल्याचे कबूल केले. त्यानुसार अन्न भेसळ प्रतिबंधक व सुरक्षा विभागाचे सुरक्षा अधिकारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी वावी पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पोलादपुर महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट 16 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार

TET Exam Scam: टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नामांकित पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्याला अटक

Lanja Tourism : पावसाळ्यातील नंदनवन! लांजाजवळील 'या' ठिकाणी घ्या निसर्गाचा मनमुराद आनंद

Mirzapur The Film: मिर्झापूरच्या गादीसाठी पुन्हा रंगणार थरार; मुन्ना भैय्यासह 'ही' जुनी पात्रं करणार कमबॅक

Wednesday Horoscope : घरातले वातावरण शांत ठेवा, ७ राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी; वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT