shahrukh khan Saam Tv News
मुंबई/पुणे

Shahrukh Khan: बॉलिवूड हादरलं! सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोराने शाहरूख खानच्याही घराची केली रेकी

Shahrukh khan News: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराने यापूर्वी बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानच्या घराचीही रेकी केली होती. या धक्कादायक माहितीनंतर बॉलिवूड हादरलं आहे.

Bhagyashree Kamble

अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर, एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. सैफ अली खानवर हल्ला करण्यापूर्वी त्याने किंग खानच्या बंगल्याचीही रेकी केल्याची माहिती समोर आली आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, सैफ अली खानच्या घरावर रेकी करण्यापूर्वी त्याने १४ जानेवारीला शाहरूख खानच्या मन्नत बंगल्याचीही रेकी केली होती. दरम्यान, सैफशिवाय शाहरूख देखील हल्लेखोराच्या निशाण्यावर होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सैफवर हल्ला करण्यापूर्वी शाहरूखच्या मन्नतची केली रेकी?

सैफ अली खान हल्ला प्रकरणात एका संशयित आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. सैफ अली खानच्या घरातून पळ काढतानाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत, संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. यासगळ्यात संशयित आरोपीने सैफवर हल्ला करण्यापूर्वी शाहरूख खानच्या मन्नत बंगल्याची देखील रेकी केली होती. अशी माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, १४ जानेवारीला संशयित आरोपीने मन्नत बंगल्याच्या आत घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याला बंगल्यात शिरता आलं नसल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. या माहितीमुळे बॉलिवूड हादरलं असून, सैफशिवाय शाहरूख देखील संशयित आरोपीच्या निशाण्यावर होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून, सैफवर हल्ला चढवणारा संशयित आरोपीनेच मन्नत बंगल्याची रेकी केली होती का? याचाही तपास सुरू आहे.

शाहरूख खानच्या मन्नत बंगल्याच्या बाहेर आणि आत अनेक सुरक्षा आहेत. शाहरूखकडे पर्सनल गार्ड्सची टीम आहे. त्याचा स्वत:चा अंगरक्षही आहे. याशिवाय मन्नतच्या प्रत्येक कोपऱ्यात कॅमेऱ्यांची नजर आहे. त्यामुळे सैफवर हल्ला करणारा संशयित आरोपीनेच मन्नत बंगल्याची रेकी केली होती का? याचा तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT