Saif Ali Khan Attack Case Update Saam Tv
मुंबई/पुणे

Saif Ali Khan Attack Case Update : 'जेहच्या खोलीत घुसला, एक कोटी रुपये मागितले..' सैफवर हल्ला कसा झाला? नॅनीनं सांगितला संपूर्ण थरार

Saif Ali Khan Attack Case News : सैफ अली खानचा धाकटा मुलगा जेहचा सांभाळ त्याची नॅनी एलियामा फिलिप करतात. सैफवर झालेल्या हल्ल्याच्या वेळी एलियामा तेथे हजर होत्या. याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे.

Yash Shirke

Saif Ali Khan Attack Updates : अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री राहत्या घरात जीवघेणा हल्ला झाला. रात्री अडीच-तीनच्या सुमारास हल्लेखोर सैफच्या घरात घुसला. प्राथमिक तपासात हल्ला करणारा व्यक्ती हा चोरीच्या उद्देशाने घरात घुसला होता असे म्हटले जात होते. या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार, हल्लेखोराने सैफच्या घरातील नॅनीकडे एक कोटी रुपयांची मागणी केली होती.

सैफ अली खानचा धाकटा मुलगा जेह यांची काळजी घेण्याची जबाबदारी नर्स एलियामा फिलिप यांच्याकडे आहे. त्या जेहच्या नॅनी आहेत. त्यांनी पोलिसांना या घटनेची सविस्तर माहिती दिली. मध्यरात्री हल्लेखोर घरात घुसला. तो जेहच्या खोलीत शिरला, तेव्हा जेह झोपला होता. जेहच्या खोलीत एलियामा होत्या. हल्लेखोराने धारदार चाकू दाखवून एलियामा यांना धमकावले आणि १ कोटी रुपये देण्याची धमकी दिली.

एलियामा यांनी पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा हल्लेखोराने त्यांच्याशी धक्काबुक्की केली. त्यात एलियामा यांच्या हाताला दुखापत झाली. जेहच्या खोलीतून येणारा आवाज ऐकून सैफ जागा झाला. एलियामा आणि हल्लेखोर यांच्या भांडणात सैफ मध्ये पडला. तेव्हा हल्लेखोराने सैफवर चाकूने वार केले. गंभीर जखमा झाल्यानंतर सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान हल्लेखोर सैफ अली खानच्या इमारतीच्या बाजूला असणाऱ्या भिंतीवर चढून त्याच्या घरात घुसला होता अशी माहिती समोर आली आहे. भिंत ओलांडल्यानंतर तो शिड्यांचा वापर करुन घरापर्यंत पोहोचला. शिड्यांवर चढताना त्याचा चेहरा एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. पोलिसांच्या १० तुकड्या हल्लेखोराचा शोध घेत आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण बॉलिवूड हादरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandup : भांडुपमध्ये मोठी दुर्घटना, पहिल्या मजल्यावरून ९ जण खाली पडले; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT