Narendra Modi - Uddhav Thackeray  Saam Tv
मुंबई/पुणे

Saamana Editorial on BJP: भाजपचे हिंदुत्व ढोंगी , तर मुस्लिम प्रेमदेखील मतलबी; 'सामना'तून जोरदार टीका

Political News : भाजपसारखा ढोंगी आणि नौटंकीबाज पक्ष हिंदुस्थानात दुसरा कोणता नसेल.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News : भाजपला देशातील मोठा मुस्लिम वर्ग मतदान करत नाही, असं बोललं जातं. मात्र भाजपने आगामी 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपली तयारी सुरु केली आहे. यात भाजपने मु्स्लीम मतदारांनाही आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्याअंतर्गत योगी सरकार 'सूफी संवाद महाअभियान' आयोजित करणार आहे.

यासह भाजप मुस्लिम समाजाला आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करणार आहे. यावरुन शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून निशाणा साधण्यात आला आहे. भाजपचे हिंदुत्व तर ढोंगी आहेच, पण मुस्लिम प्रेमदेखील मतलबी आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

भाजप ढोंगी आणि नौटंकीबाज पक्ष

भाजपसारखा ढोंगी आणि नौटंकीबाज पक्ष हिंदुस्थानात दुसरा कोणता नसेल. राजकीय स्वार्थासाठी हे लोक कधी काय सोंगेढोंगे करतील याचा भरवसा नाही. एका बाजूला हिंदुत्वाच्या नावावर मुस्लिम समुदायावर हल्ले करतात तर निवडणुका येताच त्याच मुस्लिमांशी चुंबाचुंबी करून सेक्युलरवादाचा बुरखा पांघरत असतात. सुफी दर्ग्यावर जाणाऱ्या मुस्लिमांना कव्वालीच्या माध्यमातून मुस्लिमांबाबत भाजपच्या मनात कसा द्वेष नाही, असे सांगण्यात येणार आहे. (Breaking Marathi News)

भाजपला मुस्लिम प्रेमाची उचकी लागली

भाजपचे हे मुस्लिम प्रेम खरे नसून पुतनामावशीचे आहे. हा उमाळा मुस्लिम समाजाविषयी नाही, तर मुस्लिम मतांसाठीचा आहे. 2024ची लोकसभा निवडणूक आता एक वर्षावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे भाजपला मुस्लिम प्रेमाची उचकी लागली आहे. ही उचकी एक वर्षभर टिकेल आणि निवडणूक संपली की थांबेल, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

एकीकडे हिंदू-मुस्लिम वाद पेटवून दंगली घडवायच्या आणि त्यावर स्वतःच्या राजकीय पोळ्य़ा भाजून घ्यायच्या हाच या मंडळींचा 'हिंदुत्ववाद' आहे. नुकत्याच झालेल्या रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी देशाच्या विविध भागांत झालेल्या दंगली या योजनेचाच एक भाग होता. राजकारणाचे भाजपचे हे परंपरागत तंत्र आहे, असा घणाघात सामनात करण्यात आला आहे.

भाजपला स्वतःचा 'इझम' नाही

जागोजागी हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण करायचा आणि दुसरीकडे सुफी दर्ग्यांमध्ये जाऊन मुस्लिम प्रेमाची 'कव्वाली' गायची. हे ढोंग आहे. भाजपचे हिंदुत्व तर ढोंगी आहेच, पण मुस्लिम प्रेमदेखील मतलबी आहे. मतलब संपला की, त्यांचे लोक पुन्हा मुस्लिमांचे झुंडबळी घ्यायला मोकळे. (Maharashtra Political News)

भाजपचे नवकव्वाल म्हणजे तात्पुरती व्यवस्था आहे. भाजपला स्वतःचा 'इझम' असा नाहीच. तसे असते तर वीर सावरकरांच्या नावाने यात्रांचे ढोंग करताना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्या आंदोलनातील योगदान नाकारण्याचे पाप त्यांनी केले नसते, अशी टीका सामनातून भाजपवर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT