ST Workers : एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचं वृत्त समोर आलं आहे. एसटी (ST Workers) कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारल्यानंतर पगार मिळाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याच्या पगार एसटी कर्मचाऱ्यांना मिळाला आहे. त्यामुळे १० तारखेपर्यंत पगार जमा करण्याचे न्यायालयाच्या आदेशानंतरही दोन दिवस विलंबाने पगार मिळाला आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी (Diwali) गोड होणार आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य परिवहन मंडळातील ८०० कंत्राटी चालकांनी संपाचे हत्यार उपसले होते. ९ महिने राज्य परिवहन महामंडळाला सेवा देऊनही ३ ऑक्टोबर रोजी कोणतीही पूर्व कल्पना अथवा नोटीस न देता ८०० कंत्राटी चालकांना कमी करण्यात आले.
या निर्णयामुळे कंत्राटी चालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना पगार अद्याप दिलेला नसताना अचानकपणे घेतलेल्या या निर्णयामुळे कंत्राटी कामगारांनी मंत्रालयावर एल्गार लाँग काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या अखेर सप्टेंबर महिन्याचा पगार मिळाला. महिन्याच्या १० तारखेपर्यंत पगार जमा करण्याचे न्यायालयाच्या आदेशानंतरही दोन दिवस विलंबाने पगार मिळाला. महिनाच्या १० तारखेपर्यंत पगार जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिला होता. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर दोन दिवस विलंबाने पगार मिळणार आहे. पगारानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांना बोनसची प्रतीक्षा करावी लागणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाल्यामुळे त्यांची दिवाळी गोड होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.