Rupali Chakankar saam tv
मुंबई/पुणे

Rupali Chakankar News: रुपाली चाकणकरांना आमदार व्हावंसं वाटतंय! 'या' मतदारसंघातून इच्छुक

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Chandrakant Jagtap

Rupali Chakankar News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत मोठे विधान केले आहे. तसेच त्या कोणत्या मतदारसंघातून लढण्यास इछुक आहेत याचा खुलासा देखील त्यांनी केला आहे.

रुपाली चाकणकर यांनी खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 'सरकारनामा विशेष' मुलाखतीत चाकणकर यांनी खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या इच्छेसह इतरही अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

खडकवासलामध्ये विद्यमान आमदार कोण ?

खडकवासला विधानसभा निवडणुकीत २०१९ साली अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीची लढत झाली होती. यात भाजपच्या भीमराव तापकीर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिन दोडके यांचा निसटता पराभव केला होता. मात्र आता खडकवासला मतदारसंघाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (Latest Marathi news)

२०१९ मध्येच केली होती तयारी

रुपाली चाकणकर यांनी सांगितले की २०१९ मध्ये निवडणुकीवेळीच मी अजित पवारांकडे उमेदवारीसाठी अर्ज दिला होता. मात्र माझ्या मुलाखतीआधीच पूर्वीच्या महिला प्रदेशाध्यक्षा पक्ष सोडून गेल्या. त्यावेळी निसर्ग मंगल कार्यालयात सर्वच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होत्या, त्यात माझीही मुलाखत होणार होती, अशी माहिती त्यांनी दिली.

"स्पर्धक असेल तर काम करायला मजा येते"

खडकवासला मतदारसंघातून लढण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये अनेक स्पर्धक होते, असे विचारल्यानंतर चाकणकर म्हणाल्या की, स्पर्धक असेल तर काम करायला मजा येते. कामाचे मूल्यांकन करता येते. जिथे स्पर्धाच नसेल तर तुम्ही विजेता कसे ठरू शकता. स्पर्धकच नसेल तर तुम्ही जिंकू शकत नाही. त्यामुळे स्पर्धक हवेच असेही त्या म्हणाल्या. (Maharashtra Political News)

भाजप प्रवेशाच्या चर्चांवर काय म्हणाल्या?

भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चांवर बोलताना देखील चाकणकर यांनी रोकठोक भूमिका मांडली. 'विरोधकांना माझ्या भाजपप्रवेशाच्या चर्चा करताना जास्त उत्साह वाटत असावा, असे त्या म्हणाल्या. कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री प्रोटोकाँलनुसार महिला आयोगाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतो. त्याचमुळे या चर्चा होत असतील, असेही त्या म्हणाल्या. पहिल्यांदाच सत्ताधारी एका पक्षाचे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा दुसऱ्या पक्षाच्या आहेत असे घडले असेल, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

SCROLL FOR NEXT