rpi andolan at lonavala nagarpalika for various demands saam tv
मुंबई/पुणे

Lonavala : लोणावळा पालिकेवर आरपीआयचा घंटानाद, मागण्यांच्या पुर्ततेसाठी 15 दिवसांचा अल्टीमेटम

लोणावळा पालिकेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी त्वरित निविदा काढावी अशी मागणी आरपीआयने केली.

दिलीप कांबळे

Lonavala RPI Andolan News :

लोणावळ्यातील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला त्वरित मान्यता द्यावी यासाठी आज (साेमवार) पश्चिम महाराष्ट्र आरपीआय आणि लोणावळ्यातील भीम सैनिकांनी घंटा नाद आंदोलन केले. या आंदाेलनात माेठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले हाेते. (Maharashtra News)

लोणावळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याची जागा पार्किंगच्या नावाखाली हडप करण्याचा डाव नगरपालिकेने असल्याचा आरोप आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी केला.

आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे म्हणाले लोणावळा पालिकेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी त्वरित निविदा काढावी अशी मागणी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांना आरपीआयच्या वतीने 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 15 दिवसांत निविदा न काढल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा आरपीआयच्या वतीने देण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का? लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; पुण्यात भरचौकात टोळक्यांचा राडा, VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Beed News : बांधकाम करताना तोल गेला अन् आक्रीत घडलं, बीडमध्ये २५ वर्षांच्या तरूणाचा मृत्यू

Gold Rate Fall : सोनं स्वस्त झाले रे! आठवडाभरात किंमत ₹१९०० घसरली, वाचा २४ कॅरेट सोन्याचे नवे दर

Personal Loan चा अर्ज करताना बँक Blank cheque का मागते? काय आहे नियम, जाणून घ्या सर्वकाही

SCROLL FOR NEXT