pune viral news Saam tv
मुंबई/पुणे

Viral News : आईच्या पश्चात पिलांना मायेची ऊब देणारा कोंबडा; पिलांचं सांभाळ करणाऱ्या कोंबड्यांचे कौतुक

pune viral news : आईच्या पश्चात पिलांना मायेची ऊब देणारा कोंबडा चर्चेचा विषय ठरला आहे. पिलांचं सांभाळ करणाऱ्या कोंबड्यांचे कौतुक होत आहे.

Vishal Gangurde

आईविना पोरक्या झालेल्या पिलांचा सांभाळ चक्क कोंबडा करतोय

'लाल्या' नावाचा कोंबडा पिल्लांना देतोय ऊब

गावकरी आणि कुटुंबीयांकडून अनोख्या घटनेचे कौतुक

कोंबडा आता 'गुणी' म्हणून ओळखला जातोय

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुण्यातील भोर वाठार हिमा (ता.भोर) येथील अर्जुन खाटपे यांच्या पाळलेल्या गावठी कोंबडीने दहा बारा अंड्यांना उबवून पिंलांना जन्म दिला. परंतु पिले दहा दिवसांची असताना पिलांसह अंगणात चरत असलेल्या कोंबडीला एका अनोळखी कुत्र्याने पकडून नेले. त्यामुळे आईविना पोरक्या झालेल्या पिल्लांचे जगणे अवघड झाले. पण देव तारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे या पिलांना सांभाळ करण्यासाठी चक्क कोंबडा धावून आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यास मदत होईल, या हेतूने ग्रामीण भागात घरगुती कुक्कुटपालन केले जाते. यातूनच खाटपे यांनी काही कोंबड्या पाळल्या आहेत. त्यातील १०- १२ लहान पिल्ले असलेल्या कोंबडीला अज्ञात कुत्र्याने पळवले. त्यामुळे अवघी दहा दिवसांची असलेली पिल्ले आई विना पोरकी झाली. त्यात ती गावढी असल्याने त्यांना वाढवणे,सांभाळ करणे अशक्य वाटत होते. तरीही खाटपे यांनी त्या पिलांना घरातील पडवीत निवार्याला ठेवले. इतर कोंबड्याही त्या पिलांना जवळ घेत नव्हत्या. मात्र, खाटपे यांचा लाल्या नावाचा कोंबड्याने कधीही न पाहिलेले आश्चर्य पाहायला लावले.

कोंबडीसारखा हा कोंबडा पिलांना पंखाखाली घेत आहे. पिलांना चोचीने दाणे भरवत आहे. तसेच नेहमीच दूरपर्यंत फिरणाणारा कोंबडा पिल्लांना सोडून क्षणभरही बाजूला जात नाही. रात्रभर तर दिवसा कधीतरी पिलांना आपल्या पंखाखाली घेऊन मायेची ऊब देत आहे. याशिवाय कावळा,घार मांजर,कुत्रे यांपासून पिल्लांचे संरक्षणासाठी सदैव तत्पर राहून पिल्लांचा कोंबडीपेक्षा जास्त सांभाळ करत असल्याचे पाहायला मिळाले.

कोंबडा पिल्लांचा सांभाळ करत असून पिल्लांना कोंबडी प्रमाण सर्व शिकवत असून आई नसताना पिल्लांचे संगोपन करणाऱ्या गुणी कोंबड्याला आम्ही आता विकणार नसून शेवट पर्यंत सांभाळ करणार असल्याचे अलका खाटपे यांनी सांगितले. तर पारुबाई खाटपे यांनी माझ्या ८० वर्षाच्या आयुष्यात अशी घटना पाहिली नसून या कोंबड्याचे मला मोठे कौतुक वाटत असून या कोंबड्याला पाहायला गावासहित परिसरातील नागरिक येत असल्याचे सांगितले. यावेळी अर्जून खाटपे, ऋतुजा खाटपे, कलाबाई खाटपे, कमाबाई खाटपे उपस्थित होत्या.

कोंबड्याच्या मातृत्वाचे कौतुक

मानवी जीवनात हल्लीच्या काळात जो तो आपापल्या गरजा भागवण्यासाठी व्यस्त असतो. धावपळीच्या युगात स्वतःचे पाहतानाच वेळ पुरत नाही. किंवा आईच्या निधनानंतर अनेक बालकांना अनाथाश्रम पाहायला लागल्याचे चित्र आहे. अशातच पक्षातील कोंबड्याने दाखवलेले मातृत्व अधोरेखित करण्यासारखेच आहे. अशा या गुणवान कोंबड्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Cricket News : माजी क्रिकेटपटू शोएब मलिकचा तिसरा घटस्फोट होणार? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

‘नायक नहीं खलनायक है तू'; काँग्रेसचे नेते संजू बाबावर लय संतापले, काय आहे कारण?

Ganesh Naik Vs Eknath Shinde: ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप, नाईक विरुद्ध शिंदे वाद लायकीवर?

Balasaheb Thackeray Death Controversy: बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस का ठेवला? रामदास कदमांच्या विधानामुळे राजकीय खळबळ

Laxman Hake: मराठा नेते मनोज जरांगेंच्या मागण्यांवर लक्ष्मण हाके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT