Rohit Pawar  Saam tv
मुंबई/पुणे

Rohit Pawar: 'मी राज ठाकरेंचा फॅन होतो, पण...'; रोहित पवार मनातलं बोलून गेले

Rohit Pawar on Raj Thackeray: मी राज ठाकरे यांचा फॅन होतो. पण आता दिल्लीचा आदेश पाळत आहे,असं म्हणत रोहित पवारांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Vishal Gangurde

नितीन पाटणकर, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : राज्यातील मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमधील राड्यामुळे राजकारण ढवळून निघालं आहे. धाराशिवात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपारीफेक केली. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेणफेक केली होती. राज ठाकरेंच्या 'एकला चलो रे'च्या भूमिकेमुळे राज्यात मतविभागणी होऊन महायुतीला फायदा होईल, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. आता राज ठाकरेंच्या भूमिकेवर रोहित पवारांनीही भाष्य केलं आहे. 'मी राज ठाकरेंचा फॅन होतो. पण ते दिल्लीचा आदेश पाळत आहेत, असं म्हणत रोहित पवारांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

रोहित पवारांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवारांनी विविध विषयांवर भाष्यं केलं. रोहित पवार म्हणाले, 'सत्तेत असणाऱ्या लोकांमध्ये २२० पेक्षा जास्त आमदार आहेत. सगळे अधिकार सत्तेतल्या लोकांना आहे. सत्तेतील नेते काही मराठा समाजातील नेत्यांना भेटतात. ओबीसी नेत्यांनाही नेते, मंत्री भेटतात. पण याची माहिती लोकांना दिली जात नाही. १६ टक्के आरक्षण दिले होते. मात्र, त्यावेळी ते सदावर्ते यांनी हाणून पाडलं. ते फडणवीस यांच्या जवळचे आहेत.

'सत्ताधाऱ्यांनी लोकांना खेळवत ठेवलं आहे. सत्तेतील लोकांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. सत्तेतील लोकांनी सांगावं की आम्हाला जमणार नाही. त्यांना लाडकी खुर्ची जपायची आहे. सुपारीबाजांना सांभाळायचं आहे. राज ठाकरेंचा फॅन होतो, पण ते दिल्लीचे आदेश पाळू लागले आहेत. ते दिल्लीचे ऐकत आहेत, असे ते म्हणाले.

'भाजपचा मतविभागणी करायची आहे. त्यामुळे लोक सुपारीबाज पक्ष म्हणत आहेत. पुढे सत्तेतील लोकांनाच उभं केलं जाईल. शेवटी भूमिका घेत आहेत. येत्या काळात मतदार योग्य व्यक्तीला निवडून देतील, असे रोहित पवार म्हणाले.

'राज ठाकरे यांच्यामध्ये हिम्मत असेल, तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलावं. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम भाजपने केलं आहे. द्वेष निर्माण केले जात आहे. याबद्दल राज ठाकरेंनी बोलावं. पाच वर्षात काय बदलल की तुम्हाला झुकाव लागत आहे. लोक निर्णय घेतील, खड्यासारखं कुणाला बाजूला करायचं, अशी टीका पवारांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT