Raj Thackeray : रोहित पवार म्हणाले महाराष्ट्र सुपारीबाजांचा करेक्ट कार्यक्रम करेल, मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर

रोहित पवार यांनी आरोप केला असेल, मात्र महाराष्ट्रात कोण सुपारीबाज आहे? हे आपल्याच घरातील वरिष्ठ माणसांना विचारा, मनसेकडून प्रत्युत्तर
Raj Thackeray
Raj ThackeraySaam TV
Published On

Raj Thackeray maharashtra visit : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर (MNS Raj Thackeray) निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला, २८८ जागा लढवण्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौऱ्याला (Raj Thackeray maharashtra visit) सुरुवात झाली. त्यावरुन रोहित पवार यांनी टीकास्त्र सोडलं. सरकारकडून लाडकी सुपारी योजना सुरु केली, सुपारीबाजांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही, असा निशाणा रोहित पवार यांनी साधालाय. रोहित पवारांच्या आरोपांना मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलेय.

रोहित पवारांचा राज ठाकरेंवर निशाणा -

महाराष्ट्रातून गुजरातला गेलेले उद्योग, केंद्र सरकारची गुजरातवर असलेली मेहरबानी, केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळालेला भोपळा, महाराष्ट्राचे आर्थिक, सामाजिक खच्चीकरण करण्याचे होत असलेले प्रयत्न आणि त्यात ‘लाडक्या खुर्चीच्या’ प्रेमापोटी गप्प बसलेले सरकार यामुळे महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे. या रोषाचा फटका बसू नये म्हणून मतांचे विभाजन करण्यासाठी लोकप्रिय खेळाडू मैदानात उतरवून २८८ जागा लढण्याचे आदेश सत्ताधाऱ्यांनी दिले असल्याचे कळत आहे .

खेळाडू लोकप्रिय असला तरी महाराष्ट्राला दुसऱ्याच्या इशाऱ्यावर नाचणारे, तडजोडी करणारे खेळाडू आवडत नाहीत. महाराष्ट्रात निवडणुका जवळ येत असल्याने दलालीतून गलेलठ्ठ झालेल्या सरकारने लाडकी सुपारी योजना सुरु केली असली तरी ‘महाराष्ट्र प्रिय’ असलेले खेळाडू सत्ताधाऱ्यांच्या अडकित्त्यात अडकणार नाहीत, ही अपेक्षा आहे. असो! लाडकी सुपारी योजनेच्या सर्व छोटा मोठ्या सुपारीबाज लाभार्थ्यांसकट या दलाली सरकारचा करेक्ट कार्यक्रम वाजवल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही हे मात्र निश्चित आहे.

Raj Thackeray
Vidhansabha Election 2024 : राज ठाकरेंचे दोन शिलेदार ठरले, एक उद्धव ठाकरे, तर दुसरा भाजपविरोधात, कोण मारणार बाजी?

रोहित पवारांवर मनसेचा हल्लाबोल -

मनसे नेते प्रकाश महाजन यांनी रोहित पवार यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलेय. रोहित पवारांच्या आरोपाला महाजन यांनी आपल्या शब्दात उत्तर दिले. ते म्हणाले की, रोहित पवार यांनी आरोप केला असेल, मात्र महाराष्ट्रात कोण सुपारीबाज आहे? हे आपल्याच घरातील वरिष्ठ माणसांना विचारा. रोहित पवार यांचा असा कोणता व्यवसाय आहे की ज्यामधून त्यांनी कन्नडचा सहकारी साखर कारखाना घेतला. ते आधी रोहित पवार यांनी मला सांगावं.

त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी देखील मला असं सांगावं की यांच्या शेतीत 110 कोटी रुपयाची वांगी कशी आली. मी अनेक वेळा बारामती ला जातो आणि मित्राला विचारतो ते 110 कोटी रुपयांचा वांग्याचे भरीत खायला मिळेल का? मात्र ते वांग्याचे भरीत मला अजूनही खायला मिळाला नाही. मग ही सुपारी वाजवली कशी हे आम्हालाही कळू द्या, असे प्रकाश महाजन म्हणाले.

Raj Thackeray
Manoj Jarange : राज ठाकरे म्हणाले आरक्षणाची गरज नाही, मनोज जरांगे संतापले; म्हणाले, आरक्षणातलं कळत नाही...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com