Rohit Pawar Saam tv
मुंबई/पुणे

Rohit Pawar on Ajit Pawar : 'अजित पवार मुख्यमंत्री होत असतील तर...'; रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rohit Pawar News : रोहित पवार यांनी मुख्यमंत्रिपदावरील घडामोडींवर भाष्य केलं आहे. रोहित पवार यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

नितीन पाटणकर, साम टीव्ही

पुणे : महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा पेच अद्याप सुटेना झाला आहे. विधानसभा निकाल महायुतीच्या बाजुने लागून पाच दिवसून उलटूनही मुख्यमंत्रिपदाचा पेच कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे साऱ्यांचं लक्ष या राजकीय घडामोडींकडे लागलं आहे. मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीच्या नेत्यांच्या दिल्लीवारी सुरु झाल्या आहेत. याचदरम्यान, अजित पवार मुख्यमंत्री होत असतील तर मी स्वत: जाऊन फुलांचा गुच्छ देईल. तसेच पुतण्या म्हणून आशीर्वाद देखील घेईल, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे. रोहित पवार यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

रोहित पवार हे पुण्यात आहेत. राज्यातील मुख्यमंत्रिपदाच्या घडामोडींवर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, 'महाराष्ट्राची लोकशाही गुजरातच्या ईव्हीएममध्ये अडकतेय का? लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर निवडणूक आयोगाने समोर आले पाहिजे. महाराष्ट्र राज्य देशातील विकसित राज्य आहे. बहुमत असताना देखील महाराष्ट्राचा निर्णय घेण्यासाठी दिल्लीला जावं लागतंय. एकनाथ शिंदे केंद्रात जातील आणि त्यांचे चिरंजीव उपमुख्यमंत्री होतील असं दिसत आहे. त्यात अजित पवार मुख्यमंत्री होत असतील तर मी त्यांना फुलांचा गुच्छ देईल. त्यानंतर पुतण्या म्हणून त्यांचे आशीर्वाद घेईल'

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नाही तर मी अंगावर पेट्रोल ओतून घेईल, असं वक्तव्य भाजप नेते अवधुत वाघ यांनी केलं आहे. अवधुत वाघ यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, 'कोणी असं करू नये. केंद्रातील नेत्यांनी वेगळा निर्णय घेतला आहे. कोणी पेट्रोल किंवा रॉकेल ओतून घेऊ नका. तुमच्या आई-वडिलांचा चेहरा आठवा'.

छगन भुजबळ यांच्यावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, 'छगन भुजबळ यांचं मी अभिनंदन करतो. ते निवडून आले आहेत. ईव्हीएम मॅनेज झालं नसेल म्हणून ते २६ हजारांनी निवडून आले असतील. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ते खचून जाऊ नये, यासाठी मी लढत आहेत. निवडणूक आयोगाला ऐकावं लागेल आणि ईव्हीएमचं पोस्टमार्टम करावं लागेल. ईव्हीएमच्या विरोधात सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि लढलं पाहिजे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT