Robbery attempt at jewellery shop in Ambegaon Pathar area pune police arrested 7 accused Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: ऐन दिवाळीच्या धामधुमीत सराफा दुकानावर दरोड्याचा प्रयत्न; पुणे पोलिसांकडून ७ आरोपींना अटक

Pune Crime News: ऐन दिवाळीच्या धामधुमीत सराफा दुकानावर दरोडा टाकण्यासाठी दबाब धरून बसलेल्या ७ गुंडाना पुणे पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

Satish Daud

सचिन जाधव, साम टीव्ही

Pune Latest Crime News

ऐन दिवाळीच्या धामधुमीत सराफा दुकानावर दरोडा टाकण्यासाठी दबाब धरून बसलेल्या ७ गुंडाना पुणे पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. आरोपीकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे, मिरची पावडर, मोबाईल, दुचाकीसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहेत. सर्व आरोपी विशीतील असून अन्य दोघेजण अल्पवयीन आहेत. पोलिसांच्या या कारवाईचं अनेकांकडून कौतुक केलं जात आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अर्जुन मोहन बेलदरे (वय २०), तुषार दिलीप माने (वय १९, दोघे रा. आंबेगाव बुद्रूक), राधेमोहन सीताराम पिसे (वय १९, रा. वारजे माळवाडी), समीर ज्ञानेश्वर मारणे (वय २०, रा. नऱ्हे गाव), यश मनोज लोहकरे (वय १९, रा. आंबेगाव पठार), अनिल दिलीप माने (वय २०) आणि ओंकार ऊर्फ मयूर दादासाहेब माने (वय २०, रा. आंबेगाव बुद्रूक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी ऐन दिवाळीत आंबेगाव पठार येथील त्रिमूर्ती चौकातील एका सराफा पेढीवर दरोडा टाकण्याचा (Crime News) प्लान आखला होता. ही टोळी बुधवारी रात्री त्रिमूर्ती चौकातील आंबेगाव पठार येथील राजे चौकात दबा धरून बसली होती. याबाबत खबऱ्यांकडून माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांच्या (Police) पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली.

कोयत्याने वार करणाऱ्या टोळीतील तिघांवर ‘मोका’

बालाजीनगर येथील के. के. मार्केट परिसरात एकावर कोयत्याने वार करून दहशत माजविणाऱ्या गुंड सनी जाधव याच्यासह अन्य दोन साथीदारांविरुद्ध मोका कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त यांनी मोका कारवाईचा आदेश दिला.

सनी शंकर जाधव (वय २१, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), सलमान ऊर्फ सल्या हमीद शेख (वय २३, रा. बालाजीनगर) आणि वैभव ऊर्फ बबलू ऊर्फ मनोज विवेक कोठारी (वय २७, रा. बालाजीनगर, धनकवडी) अशी मोका कारवाई केलेल्यांची नावे आहेत. सनी जाधव हा अद्याप फरार आहे. या टोळीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दरोडा, गंभीर दुखापत करणे अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT