Gopichand Padalkar's appeal to the Chief Minister Uddhav Thackeray regarding ST Bus strike
Gopichand Padalkar's appeal to the Chief Minister Uddhav Thackeray regarding ST Bus strike Saam TV
मुंबई/पुणे

ST Bus Strike: महाराष्ट्राला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखा- पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Bus Strike) सुरु आहे. मात्र अजूनही यावर तोडगा निघालेला नाही. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ केल्यानंतर काही कर्मचारी कामावर परतले असले तरी पुर्ण क्षमतेने एसटी वाहतुक सुरु झालेली नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Bus Workers) मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही बैठक घेतली होती. याबाबत आता भाजपचे नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी एसटी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करत मुख्यमंत्र्यांना संपाबाबत (Strike) तोडगा काढण्याचं आवाहन केलंय. (Respect the word given to Maharashtra- Padalkar's appeal to CM regarding ST Bus strike)

हे देखील पहा -

गोपीचंद पडळकर म्हणाले की, आज सर्वात अगोदर सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी एकजूटीनं लढा दिला. कुठल्याही युनियनची सभासद फी भरली नाही. महसूलात घट आणली आणि त्यामुळेच शरद पवार यांना आज तुमच्या विषयाबद्दल खुलेआम तुमच्या सोबत चर्चा करण्यास भाग पाडले. मला मंत्री अनिल परब यांना विनंती करायची आहे की, आपण हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सगळे दरवाजे ठोठावत आहात. त्यापेक्षा स्वत: आझाद मैदानात जाऊन आपल्याच मराठी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा का करत नाहीत? स्वत: भेटावं आणि ठामपणे आश्वासित करावं की बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात येईल जेणेकरुन चर्चेचा मार्ग मोकळा होईल.

पडळकर पुढे म्हणाले की, तसेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले होतेच की, मी माझ्या मंत्र्यांना स्वतः मोर्चाला समोरे जाण्यास सांगेल. त्यामुळे माझ्या विनंतीचा नाही तर किमान उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखा आणि दोन पाऊलं पुढे जाऊन आपुलकीने त्यांची (एसटी कर्मचाऱ्यांची) समजूत काढा, चर्चा करा आणि यावर तोडगा काढा असं आवाहन त्यांनी केलं.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangali News: सांगली, पुण्यासह ५ रेल्वेस्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी; संशयित आरोपीला मुंबईतून अटक

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट; एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला, घरांची पडझड VIDEO

Virat Kohli Crying : आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली रडला; अनुष्कालाही फुटला अश्रूंचा बांध, VIDEO व्हायरल

Monsoon Update 2024: आनंदवार्ता! येत्या ४८ तासांत मान्सून होणार भारतात दाखल; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

SCROLL FOR NEXT