Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: एकटी असल्याचं पाहून घरात घुसला अन् 3 वर्षीय चिमुरडीवर केला अत्याचार; आई येत असल्याचं पाहून काढला पळ

Pune News: पुण्यात एका तीन वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे

पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर येथे बदलापूर प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचे पाहायला मिळाले आहे. येथे एका तीन वर्षीय चिमुरडीवर एका अल्पवयीन युवकाने अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे चौदा वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर येथील पिडीत तीन वर्षीय चिमुरडीची आई घाबाहेर गेली होती. यावेळी पीडित मुलगी घरात एकटी होती. याचाच फायदा घेत हा चौदा वर्षीय अल्पवयीन युवक घरात घुसला आणि त्याने तीन वर्षीय मुलीवर अत्याचार केला.

दरम्यान, पीडित मुलीची आई घरी आली असता आरोपीने पळ काढला. याबाबत पिडीत मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पोलिसांनी चौदा वर्षीय अल्पवयीन युवकावर बाल लैंगिक अत्याचारसह बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करत त्याला तातडीने ताब्यात घेतले आहे.

आरोपीची रवानगी बालसुधारक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिणी सोनावले व पोलीस नाईक उमेश जायपत्रे करत आहेत.

सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून तरुणीवर अत्याचार

दरम्यान, आजच पुण्यात आणखी एक अत्याचाराची घटना समोर आली आहे. येथे सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून एका तरुणीवर चार जणांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. हे चारही आरोपी एकमेकांना ओळखत नसून या चारही आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी तरुणीवर अत्याचार केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

सप्तशृंगी गडावरून परतताना भीषण अपघात; दुचाकीला प्रवासी वाहनाची जोरदार धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT