Pune Corona Virus Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Corona Virus: पुणेकरांना दिलासा! मुंबईत कोरोनाचे रूग्ण १०० पार, पुण्यात एकही रूग्ण नाही

Corona Virus Pune: पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यात कोरोनाच आता एकही रुग्ण नाही. पुण्यात जे ४ रुग्ण पुण्यात आढळले होते ते बरं झालं आहेत. पालिका प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. पु्ण्यामध्ये सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही. पुण्याच्या पालिका प्रशासनाने ही माहिती दिली. पुण्यामध्ये मंगळवारी एका ८७ वर्षीय आजोबांना कोरोना झाल्याचे वृत्त समोर आले होते. पुण्यात कोरोनाने पुन्हा एन्ट्री केल्यामुळे पुणेकर चांगलेच घाबरले होते. पण आता हे आजोबा देखील बरे झाले आहेत. महत्वाचे म्हणजे पुण्यात मंगळवारी कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. महापालिकेच्या आरोग्य विभाग प्रमुख डॉक्टर नीना बोराडे यांनी ही माहिती दिली. त्यांनी पुढे असे सांगितले की, आज दुपारी ४ वाजता आरोग्य विभागाची राज्यस्तरीय बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयात आम्ही ५० बेड कोरोना रुग्णांसाठी आरक्षित ठेवले आहेत. या बैठकीत गाईडलाईन्स येतील त्यावर त्वरित काम करणार आहोत.

तसंच, 'आशिया खंडातील इतर देशांमध्ये जरी कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याची माहिती असली तरी पुण्यात मात्र कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. गेल्या पाच महिन्यात अवघ्या चार रुग्णांचे निदान झाले होते. त्या सर्वांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.' अशी माहिती डॉक्टर नीना बोराडे यांनी दिली.

दरम्यान, पुण्यातील कोरोना रुग्णाची तब्येत ठणठणीत आहे. सोमवारी पुण्यातील ८७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाली होती. या रुग्णावर उपचार करून त्यांना आता घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाची लागण झाल्यावर त्यांना एक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर या रुग्णांवर उपचार करून आता त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पुणे शहरात मंगळवारी एकही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. पुणे शहरात कोरोनाची स्थिती पूर्णपणे आटोक्यात असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

Crime: कोचकडून हॉकी खेळाडूवर बलात्कार, स्टेडिअमच्या बाथरूमध्ये नेलं अन्...; पीडित मुलगी गरोदर

X युजर्स सावधान! हे नियम पाळा नाहीतर तुमचंही अकाउंट होईल Delete

Maharashtra Live News Update : माजी आमदार शिरीष चौधरींच्या घरावर हल्ला, राजकीय षडयंत्र

Bigg Boss House: बिग बॉस मराठी६ सुरू होण्याआधी घराची पहिली झलक आली समोर; रहस्यांनी भरलेल्या घरात काय आहे नवीन?

SCROLL FOR NEXT