maval, Red Throated Pipit
maval, Red Throated Pipit saam tv
मुंबई/पुणे

Maval : दुर्मिळ पक्ष्याच्या दर्शनाने पक्षी प्रेमींच्या आनंदाला उधाण; मावळातील पक्षी वैभवात आणखी मानाचा तुरा

दिलीप कांबळे

Maval News : मावळाला निसर्गाने भरभरून निसर्गसौंदर्य दिले आहे. येथे अनेक राज्यातून परराज्यातून शास्त्रज्ञ, पक्षीप्रेमी अभ्यास करायला येत असतात. अशातच निसर्गमित्र अभय केवट (Abhay Kewat) यांना मावळात (maval latest news) दुर्मिळ पक्ष्याचें दर्शन झाले आहे. लालकंठी तिरचिमणी (Red Throated Pipit) असे त्या पक्षाचे नाव आहे. (Maharashtra News)

हा पक्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निसर्गात मुक्त संचार करताना दिसला. त्या पक्ष्याची अचूक ओळख पटवण्याकरीता अभय केवट यांनी वीस दिवस त्याचे निरक्षण केले. त्याचा अधिवास, त्याचे वर्तन याचा अभ्यास करून त्या पक्ष्याची प्रजाती ओळखून काढली. तसेच हा सुंदर दिसणारा पक्षी पुणे जिल्हा किंवा पश्चिम घाटातील भागात प्रथमच आल्याची नोंद झाली आहे. यापूर्वी महाराष्ट्रात फक्त दोनदा आढळुन आला आहे.

लालकंठी तिरचिमणी किंवा लालकंठी चरचरी (Red Throated Pipit) असे शास्त्रीय नाव आहे. हा पक्षी उत्तर युरोप आणि पेलीआर्कर्टिक व उत्तरीय अलास्का (Northern Alaska) विदेशात आढळणारा चिमणी कुळातील पक्षी आहे. हा खूप दूरवर सातसमुद्रा पार करून स्थलांतर करणारा पक्षी असूनयाचे विशेषता हा पक्षी हिवाळ्यात दक्षिण आफ्रिका, किंवा पूर्व आशिया आणि अमेरिकेकडील पश्चिमी समुद्रकिनारी स्थलांतर करतो.

भारतात हा पक्षी कधीतरी अंदमान बेटावर आढळतो. हा पक्षी आकाराने साधारण चिमणी पेक्षा थोडा मोठा आणि परीट पक्षी सारखा दिसतो.याचे खाद्य गवतावर असणारे छोटे कीटक आणि अळ्या आहेत.तर प्रजनन पूर्व काळात या पक्ष्यांच्या चेहऱ्यावर आणि गळ्याभोवती लालसर तपकिरी रंग येतो म्हणून याचे नाव (Red Throated Pipit) असे पडले आहे.

हा पक्षी साधारणपणे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठड्यात परतीचा प्रवासाला सुरवात करतो. या पक्षाच्या दर्शनामुळे पक्षी प्रेमी यांच्या आनंदाला उधाण आलंय. त्यामुळे मावळातील पक्षी संपदा अजुनही टिकून आहे आणि आज ही मावळ तालुका वन्यजीव आणि दुर्मिळ पक्षीं यांच्यासाठी स्वर्गच आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Josh Baker Death: इंग्लंडच्या २० वर्षीय जोश बेकरच्या मृत्यूचं नेमकं कारण काय?

Gondia News : १५० रुपये क्विंटलने मोबदला मिळेपर्यंत भरडाई बंद ठेवण्यावर राईस मिलर्स ठाम; ५४० कोटीचे धान पडून

Maval News: अंघोळीसाठी पाण्यात उतरले, पोहताना दम लागला; इंद्रायणी नदीत बुडून दोन भावंडांचा मृत्यू

WhatsApp Account Ban: व्हॉट्सअॅपकडून भारतात गेल्या वर्षी ७ कोटी अकाउंट्सवर बंदी; अहवालातून माहिती समोर

Chitra Wagh : "मी चारित्र्यवान कलावंत, माफी मागा नाहीतर...", 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT