Pune Terrorist News Update Saam TV
मुंबई/पुणे

Pune Terrorist News : पुण्यातून अटक केलेले दहशतवादी बाईक चोरायचे, बॉम्बस्फोट नाहीतर... चौकशीत धक्कादायक कारण आलं समोर

Pune Crime News : दोन्ही दहशतवादी मध्यप्रदेशच्या रतलाममधील मूळ रहिवासी असून जयपूर बॉम्बस्फोट कटातील फरार आरोपी आहेत.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News : पुण्यातील कोथरूडमधून अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांच्या चौकशीची अनेक गोष्टी समोर येत आहेत. दहशतवादी दुचाकी का चोरायचे याचं कारण समोर आलं आहे. १८ जुलै रोजी या दोन्ही दहशतवाद्यांनी कोथरूड भागात दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला होता.

दुचाकी ही बॉम्बस्फोटासाठी नव्हे तर पळून जाण्यासाठी चोरण्याचा त्यांचा प्लान होता. आपल्याला अटक होईल या भीतीने दुचाकीवरुन गावी जायचा त्यांचा डाव होता. (Pune News)

पुणे पोलिसांनी १८ जुलै रोजी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान (वय २३) आणि महम्मद युसूफ महम्मद याकूब साकी (वय २४) या दोन दहशतवाद्यांना अटक केली होती.

दोन्ही दहशतवादी मध्यप्रदेशच्या रतलाममधील मूळ रहिवासी असून जयपूर बॉम्बस्फोट कटातील फरार आरोपी आहेत. मुंबईतील भेंडी बाजारमध्ये राहिल्यानंतर ते पुण्यात पळून आल्यावर कोंढवा भागात वास्तव्यास होते. (Latest Marathi News)

एकूण ५ जणांना अटक

दोन्ही दहशतवाद्यांशी संबंधीत आतापर्यंत ३ जणांना अटक केली आहे. ठाणे जिल्ह्यातल्या पडघा यथे राहणारा झुल्फिकार अली बडोदावाला असं अटक केलेल्या पाचव्या आरोपीचे नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: लिफ्टमध्ये अडकली होती २ मुलं, धाडस दाखवत मुलीने वाचवले प्राण, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी मोठी अपडेट

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

SCROLL FOR NEXT