मुंबईतील खड्ड्यांवरुन आशिष शेलार आणि अमित ठाकरे काय म्हणाले, वाचा सविस्तर... Saam Tv News
मुंबई/पुणे

मुंबईतील खड्ड्यांवरुन आशिष शेलार आणि अमित ठाकरे काय म्हणाले, वाचा सविस्तर...

मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन भाजपा आणि मनसे आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार आशिष शेलार आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी यांनी प्रशासनावर टीका केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन भाजपा आणि मनसे आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांवर जोरदार आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. तर मनसे नेते अमित ठाकरे यांनी फेसबुकर पोस्ट लिहीत प्रशासनावर टीका केली आहे. शिवसेनेने 'गेल्या 24 वर्षात 21 हजार कोटी खड्ड्यात घातले'' असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे मुंबईतील रस्त्यांच्या खड्ड्यावरुन राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. (Read what Ashish Shelar and Amit Thackeray said from the pits in Mumbai, in detail ...)

हे देखील पहा -

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत मुंबई महापौर किशोरी पेडणेकर, सत्ताधारी पक्ष शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. शेलार म्हणाले की, ''महापालिकेतच्या पोर्टलवरील माहितीप्रमाणे फक्त ९२७ खड्डे बुजवण्यात आले आले आहेत मात्र, महापौर किशोरी पेडणेकर यांनी ४२०००० खड्डे दुरुस्त केली असल्याची माहिती दिली आहे. निकृष्ठ दर्जाच्या कामांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे त्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. एकीकडे कंत्राटदारांवर कारवाई करणार म्हणायचं आणि दुसरीकडे पाठीमागच्या दाराने बिलं काढून कट-कमिशन खायचं...सब गोलमाल है!” अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.

दुसरीकडे मनसे नेते तथा राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनीदेखील खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला लक्ष्य केले आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ते म्हणाले की, ''रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे होणारे ट्रॅफिक जॅम, अपघात, वाया जाणारे इंधन या गोष्टींमुळे अगदी सर्वांचंच कंबरडं मोडलंय, पण सत्ताधारी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भ्रष्टाचारी आघाडीला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डेविरोधी आंदोलनं करतोय.खड्डयांबाबत उच्च न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल.'' असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.

मुंबईतील अनेक रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन कराव लागतोय. दरवर्षी या खड्ड्यामुळे अपघात होऊन शेकडोजण मृत्यूमुखी पडतात. खड्डे भरण्यासाठी खास वेगळे टेंडरही काढले जाते, मात्र तरीही मुंबई खड्डेमुक्त का होत नाही असा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांना पडला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT