Ravindra Chavan, Mumbai Goa Highway, Mumbai Goa Highway Potholes, Ganeshotsav 2023  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Goa Highway News : मुंबई गोवा महामार्गावर मंत्री रवींद्र चव्हाणांना काय काय दिसलं? दाै-यात कोकणवासीयांना दिली खुशखबर (पाहा व्हिडिओ)

Ravindra Chavan Mumbai Goa Highway Daurea : या दाै-याची सांगता रत्नागिरीत हाेणार आहे.

Siddharth Latkar

- सचिन कदम

Mumbai Goa Highway News : मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे (potholes on mumbai goa highway) तसेच रस्ता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून करावा. गणेशाेत्सवा पुर्वी खडे मुक्त रस्ता करा अशा सूचना देत कशेडी घाटाला पर्याय असणा-या बोगद्याची एक मार्गीका कार्यान्वित केली जाईल असे आश्वासन सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी दिले. (Maharashtra News)

सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज (शुक्रवार) सकाळी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यास प्रारंभ केला आहे. चव्हाण यांनी पनवेल (panvel) येथून या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. यापूर्वी देखील मंत्री चव्हाण यांनी मुंबई गाेवा महामार्गाची (ravindra chavan mumbai goa highway daura)पाहणी केली हाेती. त्यावेळी त्यांनी ज्या सूचना केल्या हाेत्या. त्याचे पालन झाले की नाही हे आज ते पाहत आहेत.

या पाहणी दाै-या मंत्री चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गाची एक मार्ग काम सुस्थितीत आणण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. बहुतांश ठिकाणी मंत्री चव्हाण यांना खड्डे दिसले. त्यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, ठेकेदार यांना सूचना केल्या.

वर्षभरातील सहावा दाैरा

दरम्यान मंत्री रवींद्र चव्हाण यांचा आजचा मुंबई गोवा महामार्ग संदर्भांतला गेल्या वर्षभरातला प्रत्यक्ष ६ वा पाहणी दौरा आहे. रायगड (raigad), रत्नागिरी (ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्ह्याची भविष्याची दिशा ठरवणारा हा महामार्ग बनावा यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.

माझीही हिच इच्छा

गणपती बाप्पा (Ganeshotsav 2023) येण्यापूर्वी रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग तिन्ही जिल्ह्यातील कामाचं नियोजन, देखरेख ठेवतोय कारण मुंबई गोवा हायवे राज्यातील इतर महामार्गांसारखाच सुपर हायवे व्हावा अशी कोकणच्या चाकरमान्यांप्रमाणे माझीही इच्छा असल्याचे मंत्री चव्हाण यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान मंत्रालयात बसून अधिकाऱ्यांना प्रशासकीय आदेश देणे सुरु ठेवतानाच रस्त्यावर उतरून कामही करणं हे भाजपाचा एक कार्यकर्ता म्हणून मला मिळालेली शिकवण आहे. त्यांचं अनुकरण करतोय असेही चव्हाण यांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात आमदार प्रशांत ठाकूर, नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: वर्षात १२ महिने नसून १३ महिने असणारा 'हा' अनोखा देश कोणता?

Maharashtra Live News Update : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Dhule Corporation School : महापालिकेच्या ६५ पैकी तब्बल ४५ मराठी शाळा बंद; धुळे शहरातील धक्कादायक वास्तव

Fashion Inspired By GenZ Actress: नव्या ट्रेंडसाठी या जेन झी अभिनेत्रींची फॅशन टिप्स करा फॉलो

Kapil Sharma Cafe: कपिल शर्माच्या ज्या कॅफेवर गोळीबार झाला तो 'कॅप्स कॅफे' कुठे आहे?

SCROLL FOR NEXT