पुणे: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक नेत्यांवर विविध प्रकारचे खंडणी आणि भ्रष्टाचाराचे सध्या आरोप होत आहे. यामुळे काही नेत्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. पुण्यात राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या विद्यार्थी नेत्याने एका विद्यार्थ्याकडून १० लाखांची खंडणी (NCP student leader) उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीन जीवे मारण्याची धमकी (Threat) देत ऑनलाईन आणि रोख स्वरुपात १० लाख रुपये घेतले आहेत.
हे देखील पहा-
या प्रकरणी २ जणांविरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. करण मधुकर कोकणे (Karan Madhukar kokane) (रा. हडपसर, पुणे) आणि अमर सूर्यकांत पौळ (रा. अहमदपूर, लातूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहे. आरोपी करण कोकणे हा पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष (NCP) आहे. त्याने आपला मित्र अमर पौळ यांच्या मदतीने फिर्यादी तरुणाकडून खंडणी उकळली आहे. यश जगदीश जाधव (वय- २३) असे फिर्यादी विद्यार्थ्याचे नाव आहे. तो बीड (Beed) जिल्ह्यामधील शिवाजीनगर येथील रहिवासी आहे.
विशेष म्हणजे आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांचे चांगलेच ओळखीचे आहेत. पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अलीकडे सोशल मीडिया (Social media) व्यवसायाकरीत एक ऑफिस सरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याकरिता त्यांनी फिर्यादीकडे ५० लाखांची मागणी केली होती. पण फिर्यादीने पैसे देण्यास टाळाटाळ केली होती. यामुळे आरोपींनी फिर्यादीस तू आम्हाला पैसे का देत नाही. आम्ही तुला पैसे मागत आहे हे कळत नाहीये का? तुला पुण्यात शिक्षण करू देणार नाही. तुला संपवून टाकू अशा प्रकारच्या धमक्या दिले जात होते.
यानंतर आरोपी कोकणे याने फिर्यादीकडून रोख स्वरुपात ५ लाख रुपये घेतले आहेत. तर आरोपी अमर याने फिर्यादीकडून ऑनलाईन स्वरुपात ५ लाख रुपये घेतले आहेत. दोन्ही आरोपींनी फिर्यादीकडून १० लाख रुपये उकळले आहेत. एवढे पैसे घेतल्यानंतर आरोपीनी परत फिर्यादीकडे २ लाखांची मागणी केली होती. आरोपींच्या त्रासाला कंटाळून पीडित विद्यार्थ्याने अखेर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी अमर पौळ याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास चतु:श्रृंगी पोलीस करत आहेत.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.