Ramdas Athawale  Saam tv
मुंबई/पुणे

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Ramdas Athawale News : रामदास आठवले यांच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. आठवले यांच्या दाव्यानंतर शिंदे गटाने प्रत्युत्तर दिलं आहे.

Girish Nikam

मुंबई : मुख्यमंत्रिपदावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी ट्विस्ट आलाय. एकनाथ शिंदेंना दिल्लीत केंद्रीय मंत्रिपद देणार का याची आता चर्चा सुरु झालीय. त्याला निमित्त ठरलंय केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य..पाहूया सत्तास्थापनेच्या घडामोडींमध्ये भाजपचा काय प्लॅन आहे.

विधानसभेला महायुतीचा दणदणीत विजय झालाय. बहुमताच्या संख्येपेक्षा जास्त आमदार असूनही सत्ता स्थापनेचं घोडं अडलेलं आहे. चर्चेचं गु-हाळ मुंबई ते दिल्ली सुरु आहे. तर दुसरी एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री व्हावेत म्हणून ठाण्यात आरती होतेय. तर मुंबईत सिद्धिविनायकला साकडं घातलं जातंय. शिंदेंच्या चेह-यावर निवडणूक लढवल्यामुळे शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्री करावं अशी भूमिका शिंदे गटानं घेतलीय. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू झालीय.

तर दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलेल्या विधानामुळे नव्या राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद नको असेल तर त्यांनी केंद्रात मंत्री व्हावं असा प्रस्तावच आठवलेंनी शिंदेंसमोर ठेवलाय. मात्र याला शिंदे गटानं आक्षेप घेत आठवलेंचा प्रस्ताव धुडकावून लावलाय.

एवढंच नव्हे तर आठवलेंनी एका मुलाखतीत थेट शिंदेंशी जुळत नसेल तर भाजपनं अजित पवारांसोबत सरकार स्थापन करावं असं विधान केल्यामुळे महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून सारंकाही आलबेल नसल्याचंच दिसतंय. त्यामुळे शिंदेंना केंद्रात पाठवण्याचा आणि समीकरण जुळलंच नाही तर अजितदादांसोबत सत्तास्थापनेचा भाजपचा प्लॅन आहे की काय याची चर्चा आठवलेंच्या विधानामुळे जोरदार रंगू लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात कोणती सनस्क्रीन वापरायची?

Maharashtra News Live Update: जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार

Bone cancer symptoms: हाडं सतत दुखतायत म्हणून दुर्लक्ष करताय? डॉक्टरांनी सांगितली बोन कॅन्सरची सुरुवातीची चार महत्त्वाची लक्षणं

Ahilyanagar Crime: मंदिरातील बाथरूममध्ये साधूचं नको ते कृत्य, नग्न अवस्थेत महिलेसोबत आढळला; अहिल्यानगरमध्ये खळबळ

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! तुमचाही पगार दुप्पट होणार? लाभार्थ्यांची संपूर्ण यादी आली समोर

SCROLL FOR NEXT