Rakesh Tikait On Manoj Jarange Patil Saam Tv
मुंबई/पुणे

Rakesh Tikait: मराठा आरक्षण आंदोलनावर राकेश टिकैत यांनी मांडलं आपलं मत, मनोज जरांगे यांच्याबद्दल म्हणाले...

Rakesh Tikait On Manoj Jarange Patil: शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> आवेश तांदळे

Rakesh Tikait On Manoj Jarange Patil:

''ही (महाराष्ट्राची) लढाई करणारी भूमी आहे. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आम्ही बघितले. हे आंदोलन दीर्घ काळ चालणारे आहे'', असं शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले आहेत. शिवाजी मंदिर येथे स्व. शशिकांत पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. याच कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले की, महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी आंदोलन पुन्हा करणार अहोत. शेतकऱ्याचा पिकाला भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी आपलं शेत विकत आहेत. भारत सरकारमुळे शेतकऱ्यांना समस्या निर्माण होत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राकेश टिकैत म्हणाले, ''बाहेर देशात पण ट्रॅक्टर घेऊन आंदोलन केले जातात. येणाऱ्या काळात तुम्हाला सुद्धा असेच आंदोलन करावं लागणार आहे. ज्याप्रमाणे तुम्ही आंदोलन केले, त्यामुळे मुंबईच्या वेशीवर मंत्री तुम्हाला भेटायला आले. तुमची ताकद एकत्र आली तेव्हा सरकार तुमच्याकडे आले. तुम्ही असेच एकत्र येऊन मुंबईला घेरा तुमच्या सर्व समस्या सोडवल्या जातील. पंजाबमध्ये सर्व शेतकरी एकत्र आले आणि मराठा समाज जर अमच्या सोबत आला तर, आम्हाला आनंद वाटेल.'' (Latest Marathi News)

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनीही उपथित लोकांना संबोधित केलं. ते म्हणले आहेत की, ''सगळ्या मराठा नेत्यांचे स्वप्न आता पूर्ण होत आहे. मी प्रामाणिक पणे लढत आहे. सगेसोयरे यांचा एकदा कायदा पारित झाला की, आपली लढाई संपेल.''

ते म्हणाले, ''57 लाख मराठे ओबीसीमध्ये आले आहेत. सरकार डाटा देत नाही. माझ्या मते दीड कोटी मराठा ओबीसीमध्ये आले आहेत. पहिल्यांदा मराठे एकत्र आले आहेत. 24 तास काम करत आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT