Rakesh Jhunjhunwala Saam Tv
मुंबई/पुणे

शेअर मार्केट किंग राकेश झुनझुनवाला यांचे निधन, वयाच्या ६२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध स्टॉक ब्रोकर राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शेअर मार्केटमधील (Share Market) किंग राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना २-३ आठवड्यांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. ब्रीच कँडी रुग्णालयाने (Hospital) राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूची माहिती दिली. आज सकाळी ६.४५ वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

शेअर बाजारातून पैसे कमावल्यानंतर झुनझुनवाला यांनी एअरलाइन क्षेत्रातही प्रवेश केला होता. त्यांनी Akasa Air या नवीन विमान कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती आणि ७ ऑगस्टपासून कंपनीने काम सुरू केले आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या झुनझुनवाला यांच्याकडे आज हजारो कोटींची संपत्ती आहे.

Akasa Air चे पहिले व्यावसायिक विमान मुंबईहून अहमदाबादला निघाले. आकासा एअरच्या पहिल्या फ्लाइटच्या उद्घाटन समारंभात विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित होते. त्यांनी आकासाच्या पहिल्या व्यावसायिक उड्डाणाला हिरवा झेंडा दाखवला. त्यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के.सिंगही उपस्थित होते. आकासा एअरने १३ ऑगस्टपासून अनेक मार्गांवर आपली सेवा सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

EPFO सदस्यांसाठी खूशखबर, आता ATMमधून काढा पीफचे पैसे

Maharashtra Politics: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे अॅक्टिव्ह नवरात्रीचं कारण की निवडणुकीची रणनीती?

SCROLL FOR NEXT