Raju Shetty Allegations of Corruption Against Jalindar Supekar  Saam Tv News
मुंबई/पुणे

Raju Shetty : राज्यातील कारागृह भ्रष्टाचाराचे अड्डे, राजू शेट्टींचा सुपेकरांवर आरोप; कैद्यांच्या नावाखाली ५०० कोटींचा घोटाळा

Raju Shetty Allegations of Corruption Against Jalindar Supekar : राज्यातील कारागृह भ्रष्टाचाराचे अड्डे बनल्याचा गंभीर आरोप माजी खासदार राजू शेट्टींनी केलाय.

Prashant Patil

सुप्रीम मस्कर, साम टिव्ही

पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे चर्चेत आलेले पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर पुन्हा एकदा नव्या वादात अडकलेत. पुण्यातल्या कारागृहात कैद्यांच्या दिवाळी फराळमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर राजू शेट्टींनी पुन्हा सुपेकरांवर आरोप केलाय. यावेळी राज्याच्या कारागृह विभागात रेशन , कॅन्टीन तसेच इतर उपकरण खरेदीमध्ये ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राजू शेट्टींनी केलाय.

राज्यातील कारागृह की भ्रष्टाचाराचे अड्डे?

कैद्यांच्या नावाखाली राज्यातील कारागृहात ५०० कोटींचा घोटाळा

तत्कालीन DGP अमिताभ गुप्ता आणि IG जालिंदर सुपेकर यांचा घोटाळ्यात सहभाग, शेट्टींचा आरोप

२०२२ ते २०२५ या वर्षात राज्यातील कारागृहात घोटाळा

कारागृहात रेशन, कॅन्टीन आणि इतर उपकरणे खरेदीमध्ये घोटाळा

दरम्यान, कारागृहातील कैद्यांना १ वेळचा चहा आणि दोन वेळचे जेवण वगळता बेकरी पदार्थ , फळे , भाजीपाला यासह दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या तब्बल ६२७ प्रकारच्या साहित्याच्या खरेदीचे दर जालिंदर सुपेकर यांनी निश्चीत केले असल्याचं सुद्धा शेट्टींनी सांगितले. हे दर बाजारदरापेक्षा जास्त होते असाही आरोप राजू शेट्टींनी केलाय.

कैद्यांसाठीच्या खाद्यपदार्थांचे दर

द्राक्षे: २१५ रूपये किलो

टोमॅटो: ७५ रूपये किलो

कांदा: ८८ रूपये किलो

बटाटा: ८७ रूपये किलो

गूळ: ९० रूपये किलो

साखर: ५३ रूपये किलो

चिकन: ३०० रूपये किलो

केळी: ७० रूपये डझन

कैद्यांच्या पालनपोषणासाठी राज्य सरकार वर्षाकाठी शेकडो कोटी रुपये खर्च करत असते. त्यामुळे राजू शेट्टींच्या आरोपानुसार कैद्याच्या नावाखाली भ्रष्टाचार होत असेल तर ही नक्कीच गंभीर बाब आहे. आता राजू शेट्टींच्या आरोपात किती तथ्य आहे? शेट्टींच्या आरोपानंतर सुपेकर आणि गुप्ता यांची सखोल चौकशी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Session: शाळांमध्ये शिपाई व कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने – दादा भुसेंची विधानपरिषदेत घोषणा

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे? वाचा संपूर्ण प्रोसेस

Maharashtra Politics : 'पंढरीच्या वारीत अर्बन नक्षली'; सत्ताधारी महिला आमदाराचा सभागृहात खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update: पुण्यात शॉक सर्किटमुळे चारचाकी गाडी जळून खाक; कोणतीही जीवितहानी नाही

Fact Check : अमरावतीच्या छत्री तलावाजवळ भूत? युवकाला बेदम चोपला, वाढदिवसाच्या पार्टीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT