New PMC Commissioner Saam tv
मुंबई/पुणे

New PMC Commissioner : मोठी बातमी! पुणे महापालिका आयुक्तपदी राजेंद्र भोसले यांची नियुक्ती

New PMC Commissioner Rajendra Bhosale ws : पुणे महापालिका आयुक्तपदावरून विक्रम कुमार यांची बदली करण्यात आली आहे. यानंतर या पदी राजेंद्र भोसले नियुक्ती करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

सचिन जाधव, पुणे

New PMC Commissioner Appointment :

पुण्यातून मोठी बातमी हाती आली आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातही मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहे. याचदरम्यान, पुणे महापालिका आयुक्तपदावरून विक्रम कुमार यांची बदली करण्यात आली आहे. यानंतर या पदी राजेंद्र भोसले नियुक्ती करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

राज्य सरकारने पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची बदलीचे आदेश दिले. त्यांनंतर मुंबईच्या 'एमएमआरडीए' अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलं आहे. विक्रम कुमार यांच्या जागी राजेंद्र भोसले यांची नवे पुणे महापालिका आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. तर विक्रम कुमार यांची मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विक्रम कुमार यांनी तीन वर्षांहून अधिक वेळ महापालिका आयुक्त म्हणून काम पाहिलं. गुरुवारी त्यांना पुणे महापालिकेचे प्रशासक म्हणून दोन वर्ष पूर्ण केले. गेल्या काही दिवसांपासून विक्रम कुमार यांच्या बदलीची जोरदार चर्चा होती. विक्रम कुमार यांनी गेल्या आठवड्यात पालिकेचे साडेअकरा हजार कोटी रुपयांचे बजेट सादर केले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची राज्याचे क्रीडा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पुणे जिल्हाधिकारीपदी सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना होमगार्डचे महासमादेशकपदी बढती देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या जागी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

SCROLL FOR NEXT