Raj Thackeray wrote a letter to Devendra Fadnavis
Raj Thackeray wrote a letter to Devendra Fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

वाटलं होतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून परताल, परंतु...; राज ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे -

मुंबई: नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. यानंतर महाराष्ट्रासह देशभरातील नेते शिंदे-फडणवीस यांना शुभेच्छा देत आहेत. काही नेत्यांनी सोशल मीडियाद्वारे तर, काही नेत्यांनी प्रत्यक्ष भेटून या दोन्ही नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्वीकारली. त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच तुम्ही परताल, असं वाटलं होतं. परंतु ते व्हायचं नव्हतं, असं राज ठाकरेंनी या पत्रात म्हटलं आहे.

शिवसेनेत बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी थेट सूरत गाठले. त्यानंतर आसाममधील गुवाहाटीमध्ये बरेच दिवस मुक्काम केला. या बंडानं राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं. बंड शांत करण्यात अपयशी ठरल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या.

भाजप आणि एकनाथ शिंदे गट मिळून सत्ता स्थापन करतील आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वतः गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली. आपण मात्र, मंत्रिमंडळाच्या बाहेर राहून सर्व सहकार्य करणार, असे ते म्हणाले होते. मात्र, पक्ष नेतृत्वाकडून आदेश आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले.

अखेर काल संध्याकाळी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदाची शपथ घेतली. यानंतर या दोन्ही नेत्यांना राज्यभरातील नेते, तसेच देशभरातूनही शुभेच्छा देत आहेत. राज्यातील काही नेत्यांनी प्रत्यक्ष भेटून देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. तर काही नेत्यांनी सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून शुभेच्छा दिल्या. राज ठाकरेंनीही फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी फडणवीस यांना थेट पत्र पाठवलं आहे.

राज ठाकरे पत्रात काय म्हणाले?

सर्वप्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्वीकारल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो...

तुम्ही यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्षे काम केलेत. आताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारून, पक्षादेश शिरसावंद्य मानून उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रं हातात घेतलीत. पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे, हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधिलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरुपी लक्षात ठेवण्यासारखी आहे. खरोखरच अभिनंदन!

आता जरा आपल्यासाठी

ही बढती आहे की अवनती यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. ह्या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला ह्या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे.

एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिद्ध केलेलंच आहे. त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा तुमचं मनःपूर्वक अभिनंदन!

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TRP Rating Of Marathi Serial : तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’चा टीआरपी घसरला; पहिल्या क्रमाकांवर कोणती मालिका?

Viral News: बायकोने नवऱ्याला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडलं, केली धो-धो धुलाई; VIDEO व्हायरल

Sonal Chauhan: बोल्ड सोनलचा सोज्वळ साज; जन्नत गर्लचा 'खास' अंदाज!

CSK vs SRH,IPL 2024: हैदराबादकडून पराभवाचा बदला घेण्यासाठी CSK उतरणार मैदानात; अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

Yavatmal News : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून येणाऱ्या पाहुण्यांवर काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत ४ ठार, १० जण जखमी

SCROLL FOR NEXT