बाबासाहेबांनी इतिहासाला कधीही धक्का लावला नाही : राज ठाकरे  Saam tv news
मुंबई/पुणे

बाबासाहेबांनी इतिहासाला कधीही धक्का लावला नाही : राज ठाकरे

महाराज जे सांगू पाहत होते ते त्यांनी शिवचरित्रातून मांडले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purnadare) यांनी इतिहासाला (History) कधीही धक्का लावला नाही. त्यांनी अगदी सोप्या शब्दांत शिवचरित्र (Shivcharitra) लिहीले. महाराजांना जे सांगायचे होते ते त्यांनी शिवचरित्रातून मांडले. पण त्यांनी कधीही आपल्या शिवचरित्रात दंतकथा लिहील्या नाहीत, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ज्येष्ठ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवचरित्राचे वर्णन केले आहे.

आज बाबसाहेब पुरंदरे यांचा वाढदिवस. बाबासाहेब पुरंदरे यांनी आज १०० व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्त राज ठाकरे यांनी पुण्यात बाबासाहेबांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ''मी बाबसांहेबांची व्याख्याने लहानपणापासून ऐकत आलो आहे. त्यांच्या शिवचरित्रातून बोध घेतला पाहिजे. आमची जेव्हाही भेट होते त्यावेळी ते काहीना काही नवीन गोष्टी सांगत असतात. बाळासाहेब ठाकरे आणि बाबासाहेबांचे नातेही खुप जुने आहे. बाबासाहेबांच्या व्याख्यानानां बाळासाहेब मला घेऊन जायचे. असेही यावेळी राज ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी त्यांनी नाशिकमध्ये उत्तर भारतीयांसाठी केलेल्या भाषणासंदर्भातही आपली भुमिका स्पष्ट केली. मी चंद्रकांत पाटलांना कोणतीही क्लिप पाठवलेली नाही. तसेच युतीच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, माझ्या भुमिका स्पष्ट आहेत. त्याचबरोबर त्यांनी यावेळी मराठी भाषेतील नावांची फोड करताना फडणवीस नावाचे उदाहरण दिले. फडणवीस हे मूळ मुळचे पर्शियन नाव आहे. ज्याला पर्शियन भाषेत फरदवणीस असे म्हणतात. फर्द म्हणजे कागद आणि नवीस म्हणजे लिहिणारा म्हणजेच कागदावरती लिहिणारा असा अर्थ सांगत त्यांनी इतिहासाचा दाखला दिला.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Shirur News : फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट न केल्याने भयानक कृत्य; टोळक्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला

Dussehra Apatya Leaves: दसऱ्याला आपट्याची पाने वाटण्यामागे शास्त्र काय आहे?

Kalsubai Fort History: इतिहास, वास्तुकला आणि ट्रेकिंगसाठी खास! वाचा कळसुबाई किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

America Shutdown: ट्रम्प यांना जोरदार धक्का; अमेरिकेत शटडाऊन, सरकारी काम ठप्प, पगारावरही संकट

SCROLL FOR NEXT