मुंबई: उत्तर भारतीयांना महाराष्ट्रात झालेल्या मारहणीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्याकडे खेद व्यक्त केला आहे असा दावा उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) साध्वी कांचनगिरी (Guru Maa Kanchan Giri) यांनी केला आहे. तसेच राज ठाकरे (Raj Thackeray) हे इथे येऊन माफी मागतील आणि चूक मान्य करतील असा दावा त्यांनी केला आहे. उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंग यांच्या पत्रकार परिषदेत हा दावा करण्यात आला आहे. (Raj Thackeray will come here and apologize for North Indians and will admit mistakes said Sadhvi Kanchangiri)
हे देखील पहा -
राज ठाकरेंची भेट घेतलेल्या साध्वी कांचनगिरी या थेट बृजभूषण सिंग यांच्या पत्रकार परिषदेत दाखल झाल्या. यावेळी त्यांनी राज ठाकरेंना होत असलेला विरोध शांत करण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरेंनी परप्रांतीयांना मारहाण झाल्याबद्दल माझ्याकडे खेद व्यक्त केला. असा दावा करत त्यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला. बृजभूषण सिंग हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
साध्वी कांचनगिरी पुढे म्हणाल्या की, जर राज ठाकरेंनी एका संताकडे माफी मागितली आहे, तर त्यांना तुम्हाही माफ केलं पाहिजे असं मी म्हणेल. तुम्ही तिकडे (अयोध्येत) स्टेज बांधा. माझं काम असेल की , ते (राज ठाकरे) इथे येऊन तुमच्याकडे क्षमा मागतील आणि आपली चूकी ते मान्य करतील असा मोठा दावा यावेळी त्यांनी केला आहे.
राज ठाकरेंना अयोध्येत विरोध का?
“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातत्याने उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. तसेच त्यांचा अपमानही केला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी सार्वजनिकरीत्या हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी, मगच अयोध्येत प्रवेश करावा,” अशी बृजभूषण सिंह यांची मागणी आहे. उत्तरप्रदेशातील कैसरगंजचे भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh BJP) यांनी राज ठाकरेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. उत्तर भारतीयांची जाहीरपणे माफी मागितल्यशिवाय राज यांना अयोध्येत (Ayodhya) घुसू देणार नाही, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला आहे. माझा विरोध मराठ्यांना नाही तर, राज ठाकरेंना आहे.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला ''माफी मांगो राज ठाकरे'' गीतातून विरोध
राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी समाज माध्यमांवरही बृजभूषण शरद सिंह यांच्या समर्थकांनी मोहीम सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांच्या समर्थकांनी राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी एक गाणंही तयार केलं होतं. माफी मांगो राज ठाकरे असं या गाण्याचं नाव आहे. “कदम नही रखने देंगे ये नेताजीने ठाणा हैं… माफी मांगो राज ठाकरे अगर अयोध्या आना हैं… माफी मांगो राज ठाकरे अगर अयोध्या आना हैं,” असे या गाण्याचे बोल आहेत, हे गाणं उत्तर प्रदेशासह महाराष्ट्रातही व्हायरल झालं.
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा
राज ठाकरे हे येत्या ५ जूनला उत्तर प्रदेशातील अयोध्येत जाणार आहे. या ठिकाणी राम मंदिर बांधण्यात येत आहे. राज ठाकरे अयोध्येत जाऊन शक्तीप्रदर्शन करणार आहे. यासाठी मनसेच्या राज्यभरातील शेकडो कार्यकर्त्यांसाठी रेल्वेचे तिकीट बुक करण्यात येणार आहे. तसेच राज ठाकरेंच्या या दौऱ्याचा प्रचार आणि प्रसार करण्याठी मनसैनिक बरेच कष्ट घेत आहेत. त्यासाठी मुंबईत राज ठाकरेंच्या आगामी अयोध्या दौऱ्यासाठी आतापासूनच बॅनरबाजी करण्यात आली आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.