Raj and Uddhav Thackeray  Saam Tv News
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : मोठी राजकीय घडामोड! राज ठाकरे अचानक उद्धव ठाकरेंच्या भेटीला, कारण काय?

Raj Thackeray and uddhav thackeray : मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

Vishal Gangurde

मुंबईत राजकीय घडामोडींना वेग

ठाकरे बंधूंसमोर मुंबईची सत्ता राखण्याचं आव्हान

अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या भेटीला

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी चांगलीच कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईतील सत्ता राखण्याचं आव्हान ठाकरे बंधूंवर असणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे लागलं आहे. याच आशियातील श्रीमंत महापालिकेसाठी निवडणुकीचा उमेदवारीचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा अवधी संपुष्टात आल्यानंतर राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे हे अचानक भेटीसाठी निघाल्यान राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी मैदानात १६४ उमेदवार उभे केले आहेत. तर राज ठाकरे यांच्या मनसेने ५३ उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. तर ठाकरे बंधूंनी शरद पवार गटाला 10 जागा सोडल्या. ठाकरे बंधूंनी शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवली. दोन्ही पक्षांनी इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म देऊन बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही मुंबईत काही ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधूंना कार्यकर्त्यांच्या बंडखोरी आणि नाराजीला सामोरे जावं लागलं. मुंबईतील कार्यकर्त्यांच्या बंडखोरी आणि नाराजीनाट्यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले.

दोघांमध्ये काय चर्चा झाली?

महापालिकेसाठी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले. या भेटीत महापालिका निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. मुंबईसह इतर महापालिकेतही दोन्ही ठाकरेंच्या पक्षांनी उमेदवार मैदानात उतरवले आहेत. त्यामुळे इतर महापालिका निवडणुकीबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.

तत्पूर्वी, मुंबईतील काही वॉर्डात दोन्ही ठाकरेंच्या पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. तर काही वॉर्डात बंडखोरी देखील पाहायला मिळाली. त्यामुळे पुढील काही दिवसांत दोन्ही नेते कार्यकर्त्यांची नाराजी कशी दूर करणार, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा हार्ट अटॅकने मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

आज कार्यकर्ता रस्त्यावर आला, उद्या मतदार येईल? राजकारण्यांना पुढचा सावध इशारा | VIDEO

BMC Elections: भाजपकडून अभिनेत्रीला तिकीट मिळताच युतीत बिनसलं; शिंदे गटाच्या नेत्याची बंडखोरी

Wednesday Horoscope : नवीन वर्षांत मालामाल व्हाल; ५ राशींच्या लोकांचा संपत्तीचा मार्ग मोकळा होणार

4 टर्म भाजप नगरसेवक,यंदा तिकीट कापलं; ऐनवेळी ठाकरे गटाकडून उमेदवारी, अकोल्यात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT