raj thackeray uddhav thackeray  Saam TV News Marathi
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : ठाकरे बंधूंच्या युतीत नवा ट्विस्ट? राज ठाकरेंकडून युतीबाबत सावध भूमिका, VIDEO

Maharashtra Political News : ठाकरे बंधूंनी मराठीसाठी एकीचा नारा दिला खरा पण युतीची घोषणा कधी होणार? अशी चर्चा असतानाच राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना काय आदेश दिलेत? पाहूयात

Suprim Maskar

एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत, असं म्हणत तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्यामुळे मनसे आणि ठाकरेसेनेची युती ही नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरेल, अशी चर्चा सुरु झाली असतानाच नवा ट्विस्ट समोर आलाय. आणि त्याला कारण ठरलय राज ठाकरेंनी मेळाव्याच्या दुसऱ्याच दिवशी कार्यकर्त्यांना आदेश दिले.

राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

माध्यमांमध्ये व्यक्त होण्यापूर्वी परवानगी घ्या

विचारल्याशिवाय सोशल मीडियावर पोस्ट करू नका

मुख्य माध्यमांमध्ये मत व्यक्त करताना विचार करून बोला

पक्षाची बाजू मांडताना वादग्रस्त वक्तव्य टाळा

विजयी मेळाव्यानंतर राज ठाकरेंची सावध भूमिका

दुसरीकडे युतीच्या घोषणेबाबत ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र सकारात्मक भूमिका कायम ठेवली आहे.

ठाकरे बंधू एकत्र आल्यानं महाराष्ट्रात विरोधी पक्षाला नवा चेहरा मिळेल, अशी चर्चा आहे. त्यातच राज आणि उद्धव ठाकरेंकडून युतीबाबत स्पष्ट भूमिका कधी घेतली जाते, हे याबाबत मराठी मनाला उत्सुकता आहे. मात्र पुन्हा एकदा राज ठाकरेंनी सावध पवित्रा घेतल्यानं युतीबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. त्यामुळे विजयी मेळाव्यानंतर ठाकरे बंधू युतीच्या घोषणेसाठी कधी एकत्र येणार ? याकडे राज्याचं लक्ष लागलयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

Famous Singer : प्रसिद्ध गायकावर हल्ला; थेट गाडीवरच गोळीबार, संगीत विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT