संभाजी ब्रिगेडला राज ठाकरे आज उत्तर देणार? Saam tv news
मुंबई/पुणे

संभाजी ब्रिगेडला राज ठाकरे आज उत्तर देणार?

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purnadare) आणि राज यांच्या जवळीकीवर संभाजी ब्रिगेडने टिका केली होती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज आणि उद्या पुणे दौऱ्यावर आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purnadare) आणि राज यांच्या जवळीकीवर संभाजी ब्रिगेडने नुकताच निशाणा साधला होता. राज ठाकरे हे बाबासाहेब पुरंदरे यांच्या पायाशी आहेत, म्हणूनच त्यांची अधोगती झाली, असा आरोप संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) केला होता. त्यावर मनसेनेही आक्रमक उत्तर देत प्रवीण गायकवाड यांना फिरू देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. याच वादाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची आज पत्रकार परिषद आहे. त्यात या वादावर राज ठाकरे काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचंच लक्ष आहे.

हे देखील पहा-

गेल्या महिनाभरातील राज ठाकरे यांचा आजचा पाचवा पुणे दौरा (Pune Visit) आहे. आजच्या दौऱ्यात ते शाखाध्यक्षांच्या निवडीच्या घोषणेसह ते पदाधिकाऱ्यांशी अनेक विषयांवर चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे सायंकाळी ४ वाजता ते आज माध्यमांशी संवाद साधणार आहे. त्यामुळे आज राज ठाकरे काय बोलणार याकडे संपुर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आगामी महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर राज ठाकरे अधिकच सक्रिय झाले आहेत. आजच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे अनेक महत्त्वाच्या मुद्यावर राज ठाकरे मांडणार थेट भूमिका मांडणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. यासोबत केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला दिलेली भेट आणि शुद्धीकरण या विषयावर राज काय भुमिका मांडतात, याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच लॉकडाऊन, निर्बंध आणि लोकल राज ठाकरे काय बोलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Crime: साताऱ्यानंतर बदलापुरात खळबळ; डॉक्टर महिलेवर प्राणघातक हल्ला

Maharashtra Live News Update: महाडमध्ये रेल्वे यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमरण उपोषण

India vs Australia: ऐन रंगात आलेल्या मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय; वरुणराजाच्या गोंधळानं पहिल्या टी२० सामना रद्द

Shocking: लॉजमध्ये हाई वोल्टेज ड्रामा! नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत आक्षेपार्ह स्थितीत रंगेहाथ पकडलं, बायकोने चपलेनं चोपलं; VIDEO व्हायरल

गर्ल्स हॉस्टेलमध्ये वापरलेल्या कंडोमचा खच; घटनेमागचं सत्य काय? 'हा' व्हिडिओ नेमका कुठला?

SCROLL FOR NEXT