मुंबई/पुणे

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जातीयवादी राजकारणाला ऊत; राज ठाकरे

जातीपातीतला महाराष्ट्राचा विचार बाहेर येण गरजेचं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : '१९९९ आधीही देशात जातीपाती होत्या पण, १९९९ नंतर राज्यात जातीपातीचं राजकारण सुरु झाल. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीतील द्वेष जास्त वाढला. संपूर्ण भारतात जातीपातीचं राजकारण सुरूच आहे. राष्ट्रवादीच्या उदयानंतर जातीपातीचा द्वेष सुरू झाला' हे सर्व राजकीय पक्षांना माहीत आहे, पण फक्त बोललो मी, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले. तसेच, मी प्रबोधनकार ठाकरे वाचले आणि यशवतंराव चव्हाणही वाचलेत, असंही त्यांनी म्हटंल आहे.

हे देखील पहा-

पुणे मनसे मध्यवर्षी कार्यालयात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली भुमिका स्पष्ट केली. ''देश स्वतंत्र होऊन ७४ वर्षे झाली, पण, आम्ही तुम्हाला रास्ते देऊ, पाणी देऊं वीज देऊ हेच गेल्या ७४ वर्षांपासून सुरु आहे. पण या ७४ वर्षात आपण वैचारिक दृष्ट्या प्रगत झालो का, आपण काय कमावलं, काय गमावलं, असा सवाल त्यांनी यावेळी बोलताना केला. तसेच, जातीपातीतला महाराष्ट्राचा विचार बाहेर येण गरजेचं आहे, हा या व्यक्तव्यामागचा अर्थ आहे, असंही त्यांनी सांगितलं. पण आता शाळा कॉलेजातही जातीपाती तयार झाल्या आहेत.

माथी भडकवून, जातीपातीचं राजकारण का करत आहेत, मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे की, नाही हे त्यांनी स्पष्ट सागांव. आपल्याला वॉर्डनिहाय आरक्षण नको, यात फक्त स्त्री आणि पुरुषांचे आरक्षण असावे. नरेंद्र मोदी विकासाचा मुद्द्यावर पंतप्रधान पदी निवडून आले. जातीपातीच्या आणि धर्माच्या मुद्द्यावर नाही. पण राज्यात जातीपातीचं राजकारण तयार करण्यात येत आहे. असा आरोपही राज ठाकरे यांनी यावेळी केला आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Earthquake : पालघर भूकंपाने हादरलं! घाबरून नागरिक घराबाहेर धावले, अख्खी रात्र जागून काढली

Paneer Water Soup Recipe : पनीर बनवल्यावर उरलेलं पाणी फेकता? थांबा, १० मिनिटांत बनवा हेल्दी गरमागरम सूप

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील आठही तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पंचनामाचे आदेश

Blast Blast: भारताच्या शेजारील देशात पोलीस ठाण्यावर हल्ला, १३ जणांचा जागीच मृत्यू

Diva Travel : 'दिव्या'जवळील ७ विरंगुळ्याची ठिकाणे, शहराच्या गोंगाटापासून दूर प्लान करा वन डे ट्रिप

SCROLL FOR NEXT