भेसळयुक्त साखर कशी ओळखायची? घरी या’ 3 सोप्या स्टेप्सने करा चेक

Manasvi Choudhary

साखर

साखर रोजच्या आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. चहापासून ते गोड पदार्थांपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी साखरेचा वापर केला जातो.

how to check adulterated sugar | yandex

भेसळ ओळखण्याची पद्धत

पण सध्या बाजारात मिळणाऱ्या अनेक खाद्यपदार्थांत भेसळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये साखरेमध्येही मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जात असल्याचं चित्र समोर आलं आहे.

how to check adulterated sugar | pinterest

साखरेमधील भेसळ कशी ओळखायची?

यासाठी तुम्ही भेसळयुक्त साखर ओळखणे महत्वाचे आहे. काही सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी पदार्थांमधली भेसळ ओळखू शकता.

how to check adulterated sugar | pinterest

साखरेतील भेसळ ओळखण्याची पद्धत

साखरेमध्ये भेसळ करण्यासाठी पाणी जास्त प्रमाणात वापरले जाते.

how to check adulterated sugar | pinterest

पाण्याचा प्रयोग करा

१) एका काचेच्या ग्लासात पाणी घ्या

२) आणि त्यात एक मोठा चमचा साखर टाका. साखर पूर्ण विरघळू द्या.

३) जर साखरेमध्ये माती, बारीक खडे किंवा चाक पावडरची भेसळ असेल, तर ती विरघळणार नाही आणि ग्लासाच्या तळाशी जाऊन बसेल.

how to check adulterated sugar | Saam Tv

गंध घ्या

१) थोडीशी साखर हातावर घेऊन चोळा आणि तिचा वास घ्या.

२) शुद्ध साखरेला कोणताही विशेष तीव्र वास नसतो.

३) जर साखरेतून अमोनियासारखा किंवा रसायनाचा उग्र वास येत असेल, तर समजावे की केमिकलची भेसळ आहे.

how to check adulterated sugar | pinterest

लिंबाच्या रसाचा प्रयोग करा

एका वाटीत थोडी साखर घेऊन त्यावर काही थेंब लिंबाचा रस किंवा विनेगर टाका.

जर साखरेमध्ये चाक पावडरची भेसळ असेल, तर लिंबाचा रस टाकल्यानंतर त्यात बुडबुडे येतील.

Lemon Test | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: उपवासांमुळे प्रचंड थकवा आलाय? शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी प्या ‘हे’ 5 ड्रिंक्स

Best Morning Drinks
येथे क्लिक करा...