Raj Thackeray On Maharashtra Bhushan Award Ceremony Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Bhushan Award Ceremony: राजकीय स्वार्थाशिवाय इतके लोक कुणी बोलावतं का?; राज ठाकरेंनी सरकारच्या हेतूवरच घेतली शंका

तर हा प्रसंग टाळलात आला असता, राजकीय स्वार्थासाठी इतकी लोकं बोलावली गेली : राज ठाकरे

Satish Kengar

Raj Thackeray On Maharashtra Bhushan Award Ceremony: नवी मुंबईतील खारघर (Kharghar) येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला (Maharashtra Bhushan Award ceremony) उपथित राहिलेल्या 12 श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जणांवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहे. यातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णाची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरेंनी सरकारच्या हेतूवरच शंका उपस्थित केली आहे.

इतका मोठा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये राजकीय स्वार्थ होता का, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना केला. यावर ते म्हणाले आहेत की, ''राजकीय स्वार्थाशिवाय इतके लोक कुणी बोलावतं का?'' (Latest Marathi News)

राज ठाकरे म्हणाले आहेत की, ''हा प्रसंग टाळता आला असतं बरं झालं असतं. सकाळी या गोष्टी करायची काही आवश्यकता नव्हती. सध्या सगळंच वातावरण उन्हाने तापलं आहे. अशा वेळी इतक्या लोकांना बोलवायचं, अप्पासाहेब यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. हा पुरस्कार राजभवनावर बोलून देखील देता आला असता. इतक्या लोकांना बोलून ही गोष्ट कार्याची आवश्यकता नव्हती.''

'या घटनेसाठी कोणालाही जबाबदार धरता येणार'

राज ठाकरे पुढे म्हणाले की, ''झाली ती गोष्ट दुर्दैवी आहे. याला कोणालाही जबाबदार धरता येणार नाही. मात्र हा कार्यक्रम सकाळी न करता संध्यकाळी केला असता, तर हा प्रसंग टाळता आला असता''

ते म्हणाले की, ''ही कोणी ठरवून केलेली गोष्ट नाही. इतकी लोकं येणार तर हा कार्यक्रम संध्यकाळी नाही तर सकाळीच ठेवता येणार. इतक्या लोकांना बोलावण्यापेक्षा राजभवनात बोलावून इतर लोकांना जसं पुरस्कार देतात. तसं दिल गेलं असं तर हा प्रसंग उभा राहिला नास्ता.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT