Raj Thackeray vs Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Political News : सेंटलमेंट नीट होत नाही म्हणून मोर्चा काढला का? राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर झोंबणारी टीका

Raj Thackeray vs Uddhav Thackeray : धारावी खूप मोठा भाग आहे. तिथे पुनर्विकास करताना काय काय होणार आहे. सगळ्याचं एक टाऊन प्लानिंग असतं, ते सांगितलं पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

अदानी समूहाला दिलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून शिवसेना ठाकरे गट शनिवारी १६ डिसेंबर रोजी विराट मोर्चा काढला. उद्धव ठाकरे यांनी या मोर्चातून अदानींसह राज्यातील सत्ताधारी भाजप आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित करत ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. आता जे कुणी मोर्चा काढत आहेत त्यांना आताच का जाग आली, अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली. (Latest Marathi News)

धारावी पुनर्विकाससारखा मोठा प्रकल्प मुंबईत येत आहे. मात्र तो परस्पर अदानींना का दिला? इथून सुरुवात होते. अदानींकडे असं काय आहे की विमानतळ पण तेच हाताळू शकतात, कोळसा पण तेच हाताळू शकतात, इतर गोष्टीही तेच हाताळू शकतात. सगळं अदानींनाच का? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एवढ्या मोठ्या प्रकल्पाला बाकी कंपन्यांचे टेंडर्स देखील मागवायला पाहिजे होते. धारावीमध्ये काय विकासकामं होणार आहेत, हे सगळ्यांना कळायला पाहिजे होतं. पण ते झालं नाही. मला प्रश्न एवढात आहे की, सगळ्यांना आज का जाग आली आहे.

अदानींचं नाव जाहीर होऊन जवळपास १० महिने उलटून गेले आहेत. सेंटलमेंट नीट होत नाही म्हणून मोर्चा काढला का? असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

धारावी खूप मोठा भाग आहे. तिथे पुनर्विकास करताना काय काय होणार आहे. सगळ्याचं एक टाऊन प्लानिंग असतं, ते सांगितलं पाहिजे. आठ-दहा महिन्यांनंतर जे जागे झाले आहेत, त्यांनी विचारलं का तिथे काय होणार आहे. मोर्चाचा दबाव आणून फक्त सेटलमेंट करायची आहे का? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Bribe Case: मोठी बातमी! फाईल पुढे सरकवण्यासाठी ठेकेदाराकडे पैशांची मागणी; 1 लाख 30 हजारांची लाच घेताना मनपा कंत्राटी अभियंत्याला रंगेहाथ पकडलं

३ मुलांना विष पाजले, बायकोचा गळा चिरला आणि स्वत:ला गळफास लावला, कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; टोकाचे पाऊल का उचलले?

Horoscope: करिअरमध्ये प्रगती साधाल; यश, उन्नतीचे नवीन मार्ग मिळतील

Top 7 Mileage Bikes 2026: भारतात या टू व्हिलर देतात सर्वाधिक मायलेज; लिस्टमध्ये अनेक बाईक्सचा समावेश

SCROLL FOR NEXT