Raj Thackeray- Ashish Shelar Saam TV
मुंबई/पुणे

Raj Thackeray on Ashish Shelar: नाक्यावर सभा घेणारे, यांना कोण ओळखतं? राज ठाकरेंची शेलारांवर खरमरीत टीका

Raj Thackeray on Ashish Shelar: घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातल्याच प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो, असं आशिष शेलार यांनी म्हटलं होतं.

साम टिव्ही ब्युरो

Raj Thackeray News: कर्नाटकातील पराभवनानंतर राज ठाकरे यांनी भाजपच्या वागणुकीचा आणि स्वभावाचा पराभव असल्याचं वक्तव्य केलं होतं. राज ठाकरे यांचं वक्तव्य जिव्हारी लागल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली होती.

घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातल्याच प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो, असं आशिष शेलार यांनी म्हटलं होतं. या टीकेला आता राज ठाकरे यांनीही उत्तर दिलं आहे.

अशा गोष्टी ज्यांना सुचतात ते निवडणुका आल्या की नाक्यावर सभा घेतात अशी टीका राज ठाकरे यांनी आशिष शेलार यांचे नाव न घेता केली आहे. भारत जोडो यात्रेचा परिणाम कर्नाटकाच्या विजयात झाला हे तुम्ही मोठ्या मनाने मान्य केला पाहिजे. (Latest Marathi News)

आपल्याला एखाद्या पराभवातून बोध घ्यायचाच नसेल तर बसा. मुळात यांचं अस्तित्व हे नरेंद्र मोदींमुळे आहे, यांना खाली कोण ओळखतं असं देखील राज ठाकरे म्हणाले. मी यांच्या बोलण्याच्या फार काही वाटेला जात नाही. छोटी माणसं आहेत, असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

काय म्हणाले होते आशिष शेलार?

घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातल्याच प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो. जर कर्नाटकमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा प्रभाव पडला असेल, तर मग जालंधरमध्ये आम आदमी पक्षाचा विजय आणि काँग्रेसचा पराभव का झाला? तेथे राहुल गांधीच्या यात्रेचा प्रभाव नव्हता का?

उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्येही भाजपाला यश मिळालं. तिथे भारत जोडो यात्रेचा प्रभाव नव्हता का? यावर राज ठाकरे बोलतील का? राज ठाकरे हे केवळ स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी प्रतिक्रिया देत असून त्यांच्या प्रतिक्रियेला आम्ही फार महत्त्व देत नाही, असं आशिष शेलारांनी म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

Police Transfer : पोलिस दलात मोठा फेरबदल, ३९ पोलिसांची तडकाफडकी बदली; नावं अन् धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT