Raj Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

MNS Candidate Declared: CM एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे यांनी उमेदवार केला जाहीर, दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा

Satish Kengar

विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात उमेदवार जाहीर केले.

ठाण्यातून अविनाश जाधव आणि कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार राजू पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली. जाधव आणि राजू पाटील यांचे उमेदवारी अर्ज भरताना ते स्वतः हजर राहणार आहेत, असं सांगतानाच राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला.

मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे हे आज राजू पाटील यांच्या कार्यलयाचे उद्घाटन करण्यासाठी डोंबिवलीत आले होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ''मी भाषणांसाठी आलो नाही. माझ्या राजू पाटीलच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आलो आहे. माझ्या आधीचं घर छोटं पडत होतं म्हणून नवीन घर घेतलं, आशा भेटी मिळत राहिल्या तर अजून मोठं घर घ्यावं लागेल.''

मनसेचे उमेदवार जाहीर करताना राज ठाकरे म्हणाले की, ''यादीवर शेवटचा हात फिरतवतोय. आज किंवा उद्या दुसरी यादी जाहीर होईल.'' आमदार राजू पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. तर अविनाश जाधव यांनाही मनसे तिकीट देऊ शकतं, अशी चर्चा होती. हीच चर्चा आता खरी ठरली आहे.

दरम्यान, महायुती मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा देण्याची शक्यता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंमध्ये दोन तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवडी, वरळी, माहिमसह काही मतदारसंघांवर शनिवारी रात्री चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathwada PoliticsPolitics: जरांगेंविरोधात भाजपची मराठा खेळी? जाणून घ्या मराठवाड्यासाठी BJP चा स्पेशल फॉर्म्युला

Ajit Pawar : अजित पवार गटाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर; कोण आहेत नवीन चेहरे? वाचा

Dombivli News : राज ठाकरेंविषयी अपशब्द वापरले; मनसे कार्यकर्त्यांनी दिला रिक्षा चालकाला चोप,VIDEO

Cyclone Dana: 'दाना' चक्रीवादळ या राज्यांमध्ये धडकणार, 120 किमी वेगाने वाहणार वारे; कुठे आदळणार? वाचा

Beed Politics : पंकजा मुंडेंचा समर्थक जरांगेच्या गोटात; राजेंद्र म्हस्के बीडमधून निवडणूक लढणार? VIDEO

SCROLL FOR NEXT