Mumbai Pune Rain News Saam TV
मुंबई/पुणे

Rain News: नदी, डोंगर, छतावर बरसला, पाऊस हा पुन्हा परतला! मुंबई-पुण्यात वातारण झालं आल्हाददायक

नदी, डोंगर, छतावर बरसला, पाऊस हा पुन्हा परतला! मुंबई-पुण्यात वातारण झालं आल्हाददायक

Satish Kengar

Mumbai Pune Rain News: गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज अखेर पावसाने मुंबई आणि पुण्यासह राज्यातील अनेक भागात हजेरी लावली. पावसाच्या सरी बरसताच आज मुंबईमध्ये अनेकांनी घरातून बाहेर पडत भिजत पहिल्या पावसाचा आनंद लुटला. तर काहींनी घरातच चहा आणि गरमागरम भजीचा आस्वाद घेतला.

पावसामुळे शहराचं वातारण आल्हाददायक झालं आहे. मुंबईतील अनेक नागरिक आता चौपाट्यांवर जात पावसाचा आनंद घेत आहेत. उद्या रविवार असल्याने अनेकजण पहिल्या पावसानंतर लगेचच पिकनिकचा प्लान देखील करत आहेत.

असं सगळं असलं तरी अद्याप मान्सून मुंबईत दाखल झालेली नाही. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. मान्सून आज अलिबागपर्यंत पोहोचला आहे. पुढील दोन दिवसांत तो मुंबईतही दाखल होण्यासाठी स्थिती अनुकुल आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. (Latest Marathi News)

पुण्यासह अहमदनगर जिल्ह्यात देखील आज पावसाचं आगमन झालं आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली. मृग नक्षत्र कोरडं गेल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. आज पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी आणि नागरिक सुखावले आहेत. उकाड्याने हैराण झालेल्या नागरीकांना दिलासा मिळालाय, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी आणि लावणीचे कामं सुरू केली आहेत.

यातच माणगावमध्येही सकाळपासून उघडझाप करणाऱ्या पावसाने दुपारनंतर जोर धरला. दुपारी तीन ते संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बरसलेल्या पावसाने माणगावमध्ये वाहनांना फोकस लाऊन वाहन चालवण्याची वेळ आली. या जोरदार पावसामुळे शाळकरी मुलं, पालक आणि दुचाकी स्वारांचे देखील हाल झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : तेजस्वीचं सरकार येणार, राजद नेत्याला विश्वास

Maharashtra Live News Update: पंढरपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना उस दरासाठी आक्रमक

Girija Oak Video: नॅशनल क्रश गिरिजा ओकला खटकली 'ही' गोष्टी; १३ वर्षांच्या मुलाचं नाव घेत म्हणाली...

DIG च्या मुलीनं आयुष्याचा दोर कापला, AIIMS नागपूरमध्ये घेत होती शिक्षण

Shreya Ghoshal Concert: श्रेया घोषालच्या कॉन्सर्टवेळी चेंगराचेंगरी; स्टेजजवळ हाणामारी, दोघे बेशुद्ध; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT