Mumbai Breaking News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Breaking News: हिवाळ्यात पावसाळा! मुंबईसह राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ

Unseasonal rain in Mumbai: पुणे-नाशिकसह काही भागात नागरिक गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. पण याचदरम्यान मंगळवारी रात्री मुंबईत अचानक पावसाने हजेरी लावली आहे. अचानक पाऊस आल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.

Vishal Gangurde

संजय गडदे, मुंबई

Unseasonal rain in Mumbai:

एकीकडे राज्यातील काही भागात हिवाळ्यामुळे नागरिकांना थंडीचा प्रभाव जाणवत आहे. पुणे-नाशिकसह काही भागात नागरिक गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. पण याचदरम्यान मंगळवारी रात्री मुंबईत अचानक पावसाने हजेरी लावली आहे. ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. अचानक पाऊस आल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाल्याचे दिसून आली. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, ऐन हिवाळ्यात मुंबईच्या (Mumbai) पश्चिम उपनगरात गेल्या पंधरा मिनिटांपासून जोरदार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईच्या जोगेश्वरी, गोरेगाव, ओशिवरा, अंधेरी या परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली असल्याचे पाहायला मिळाली. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या सोबतच बाहेर फिरण्यासाठी पडलेल्या मुंबईकरांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात आज मंगळवारी सकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. राज्यातील पुण, बारामती, सातारा,छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना (Rabi Crops) फटका बसण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

SCROLL FOR NEXT